T20 World Cup 2022 Final: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात रविवारी (13 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ प्रत्येक गोष्टी करून पाहतोय, ज्यामुळं त्यांना विश्वचषकावर नाव कोरता येईल. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे खेळाडू आणि सदस्यांनी रोजे ठेवले आहेत. रोजे ठेवल्यानं त्यांना 1992 सारखा विजय प्राप्त होईल, असं त्यांचा विश्वास आहे. पाकिस्तानच्या संघानं 1992 मध्ये पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं होतं.


1992 च्या विश्वचषकादरम्यान रमजानचा महिना सुरू होता. त्यावेळी इम्रान खानच्या नेतृत्वाखाली सर्व संघ आणि सदस्यांनी रोजे ठेवले होते. यामुळं अल्लाहनं त्यांच्या पदरात विजय टाकला, असा पाकिस्तान संघ आणि त्यांच्या देशातील नागरिकांचा विश्वास आहे. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघानं उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. 1992 प्रमाणेच आता पुन्हा एकदा  पाकिस्तानचा संघ इंग्लंडशी अंतिम सामना खेळणार आहे. 


बाबर आझमसह सर्वांनीच रोजे ठेवले
पाकिस्तानच्या संघ आणि सर्व मुस्लिम सपोर्ट स्टाफसह तमाम लोकं रोजा ठेवत आहेत. यंदा ईद नसली तरी अल्लाह त्यांच्या संघाला ईदी देईल, असा त्यांचा विश्वास आहे. आपण अनेक पाहायलं आहे की, कोणताही सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू त्याच्या देवाचे म्हणजेच अल्लाहचे आभार मानताना दिसतात. 


दमदार फलंदाज विरुद्ध भेदक गोलंदाज
दरम्यान, पाकिस्तानचा संघ 1992 च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडं इंग्लंडचा संघही 1992च्या विश्वचषकातील बदला घेण्यासाठी मैदानात उतरतील. एकिकडं इंग्लंडच्या संघात तडाखेबाज फलंदाज आहेत. तर, पाकिस्तानच्या संघात उत्कृष्ट गोलंदाज आहेत. यामुळं इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अतिशय रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. 


पाकिस्तानचा संघ-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, फखर जमान, मोहम्मद हॅरीस


इंग्लंडचा संघ-
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, अॅलेक्स हेल्स, टायमल मिल्स. 


हे देखील वाचा-