T20 World Cup 2022 Final: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात रविवारी (13 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषकातील महामुकाबला म्हणजेच अंतिम सामना खेळला जाणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) हा एतिहासिक सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीनं (ICC) प्लेईंग कंडिशनमध्ये काही बदल केले आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे. मेलबर्न येथील हवामानाचा अंदाज घेऊन आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीनं (ETC) राखीव दिवसाच्या (14 नोव्हेंबर) वेळेत अतिरिक्त वाढ केलीय. 


आयसीसीच्या निवेदनानुसार, 'इव्हेंट टेक्निकल कमिटीने निर्णय घेतला आहे की, सामना पूर्ण करण्यासाठी आणि निकाल मिळविण्यासाठी अंतिम सामन्याच्या अतिरिक्त दिवसाच्या वेळेत दोन ते चार तासांपर्यंत वाढ केली जाऊ शकतो. टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या दरम्यान,आवश्यक षटकं देखील कापली जातील, परंतु निर्धारित दिवशी किमान षटके टाकली गेली नाहीत, तर सामना राखीव दिवशी खेळला जाईल." दरम्यान, साखळी सामन्यांमध्ये सामन्यांचा निकाल लावण्यासाठी पाच षटकांचा खेळ होणं गरजेचं होतं. त्यानंतर नॉकआऊट सामन्यात किमान 10 षटकांच्या खेळानंतरच सामन्याचा निकाल लावला जाईल, असा नियम होता. 


हवामान खात्याचा अंदाज
मेलबर्नमध्ये रविवारी पावसाची 95 टक्के शक्यता असून, 25 मिमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी मेलबर्न येथे जवळपास 100 टक्के पावसाची शक्यता आहे.  मुसळधार पाऊस आणि ढगांच्या गडगडाटाची शक्यता खूप जास्त आहे. दुर्दैवानं सोमवारच्या सामन्याच्या 'राखीव दिवसा'मध्येही पाच ते दहा मिमी पाऊस पडण्याची 95 टक्के शक्यता आहे.


...तर दोन्ही संघात ट्रॉफी विभागून दिली जाईल
अंतिम सामन्यात दोन्ही संघामध्ये 10 षटके खेळली पाहिजेत. पण पावसामुळं दोन्ही दिवस खेळ झाला नाही तर, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ट्रॉफी विभागून दिली जाईल, असा आयसीसीचा नियम आहे. 


संघ-


पाकिस्तानचा संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, फखर जमान, मोहम्मद हॅरीस


इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, अॅलेक्स हेल्स, टायमल मिल्स. 


हे देखील वाचा-