Virat Kohli Emotional : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये भारताला अतिशय लाजिरवाण्या पराभवाला तोंड द्यावं लागलं आहे. इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. दरम्यान टीम इंडियाच्या या पराभवाने करोडो चाहत्यांची मनं तुटली आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या अनेक खेळाडूंची विश्वचषक विजयाची स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे भारतीय संघाने 2007 नंतर अजून एकहादी टी20 विश्वचषक जेतेपद पटकावलेलं नाही.
भारताला आधी नाणेफेक गमवावी लागली. ज्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात यावं लागलं. भारताचे सलामीवीर फेल झाल्यावर कोहली आणि पांड्या या दोघांनी भारताचा डाव सावरत 168 रन स्कोरबोर्डवर लावले. पण 169 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी सुरु ठेवली. कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या ओव्हरपासून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत धावसंख्या वाढवत ठेवली. बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा तर हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. ज्यामुळे अवघ्या 17 षटकातंच त्यांनी हे आव्हान पार करत सामना खिशात घातला.
कोट्यवधी भारतीयांची मन तुटली
भारताचा हा अत्यंत महत्त्वाच्या सामन्यातील पराभव एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. 2007 मध्ये भारताने पहिल्यांदा आणि शेवटच्यांदा T20 विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला. यावेळी टीम इंडिया आपल्या नेतृत्वाखाली वर्ल्ड चॅम्पियन होईल, अशी आशा सर्वांनाच होती. किंग कोहलीलाही हीच आशा होती. पण हे होऊ शकले नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला, मात्र अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करू शकला नाही. 2007 नंतर 2014 मध्येही T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. त्यांना अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर इंग्लंडने 2010 मध्ये विजय मिळवला होता, तर 2016 मध्येही फायनल गाठली होती. पण फायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून 4 विकेट्सने ते पराभूत झाले. यंदा त्यांना पाकिस्तानला मात देऊन विश्वचषक जिंकायची संधी आहे.
हे देखील वाचा-