IND vs ENG Semi Final T20 WC : ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल मैदानात टी20 विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना सुरु आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली असून त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली आहे. ज्यानंतर किंग कोहली आणि कुंग फू पांड्या यांनी भारताचा डाव सावरत दमदार अशी अर्धशतकं झळकावत 168 पर्यंत धावसंख्या नेली आहे. ज्यामुळे जिंकण्यासाठी इंग्लंडला आता 169 धावा करायच्या आहेत.
या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताला नाणेफेक गमवावी लागली. ज्यानंतर इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात यावं लागलं. सलामीवीर केएल राहुल अगदी स्वस्तात 5 धावा करुन तंबूत परतला. तर रोहितने मात्र 27 धावांची खेळी केली, पण तो देखील मोठी खेळी करु शकला नाही आणि भारताला दुसरा झटका बसला. ज्यानंतर कोहली आणि सूर्या आजही दम दाखवतील असं वाटत असताना सूर्यकुमार 14 धावांवर बाद झाला. पण कोहली मात्र एकहाती झुंज देतच होता. पांड्याने त्याला संथगतीने साथ दिली. मग कोहली 50 धावा करुन बाद होताच पांड्याने गिअर अप करत फटेकबाजी सुरु केली. त्याने 33 चेंडूत 63 धावा ठोकल्या पण शेवटच्या चेंडूवर तो चूकीने हिटविकेट झाला ज्यामुळे भारतीय डावाचा अखेरचा चेंडू निर्धाव राहिला. ज्यामुळे भारताने 168 धावा केल्या असून इंग्लंडला विजयासाठी 169 धावांची गरज आहे.
कोहलीनं गाठला 4000 धावांचा टप्पा
भारतीय संघाचा डाव सावरत विराट कोहलीनं (Virat Kohli) एका नव्या विक्रमाला गवसणी देखील घातली. विराट कोहलीनं आज अर्धशतक झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 4000 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. कोहलीनं आजच्या सामन्यातील 50 धावांसह 115 सामन्यात 4008 रन पूर्ण केले आहेत.
हे देखील वाचा-