Virat Kohli Hair Style : माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागील बऱ्याच काळापासून खास फॉर्ममध्ये नसल्याचं दिसून येत होतं. पण आशिया कपमध्ये त्यानं दमदार कामगिरी केली अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकलं आणि कोहली फॉर्मात परत आला, या चर्चांना उधाण येऊ लागलं. दरम्यान आता कोहली आगामी टी20 विश्वचषकासाठी सज्ज झाला असून भारतीय क्रिकेच चाहत्यांच्याही सर्वाधिक नजरा या विराट कोहलीवरच असणार आहेत. अशामध्ये विराटने खेळासह आपल्या लूकवरही काम करत वर्ल्डकपपूर्वी नवा लूक घेतला आहे.


हेअरस्टायलिस्ट राशिद सलमानी (Rashid Salmani) याच्याकडून विराटने नवा हेअरकट करुन घेतला असून राशिद याने स्वत: विराटचे नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. किंग कोहलीसाठी नवा लूक असंही राशिदनं फोटोंवर लिहिलं आहे. विराटचा हा नवा हेअरकटमधील लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचे फॅन्सही फोटो रिपोस्ट करताना दिसत आहेत. 






 


टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट दुसरा फलंदाज
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. विराटनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 104 सामन्यात 138 च्या सरासरीनं 5 हजार 584 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. 


आशिया चषकात दमदार फलंदाजी
विराट कोहली जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये होता. परंतु, आशिया चषकात दमदार फलंदाजी करत त्यानं पुन्हा फॉर्म गवसलाय. आशिया चषकातील सुरूवातीच्या सामन्यात त्यानं लहान खेळी खेळल्या. परंतु, अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात 53 चेंडूत शतक झळकावलं. दरम्यान, 1 हजार 20 दिवसानंतर विराटच्या बॅटमधून शतक झळकलं.


विराटची कसोटी आणि एकदिवसीय कारकिर्द
विराटनं 102 कसोटी आणि 261 एकदिवसीय आंतराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. कसोटी सामन्यात विराटच्या नावावर 8 हजार 74 धावांची नोंद आहे. ज्यात 27 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 43 शतक आणि 64 अर्धशतकांच्या मदतीनं त्यानं 12 हजार 344 धावा केल्या आहेत. 


हे देखील वाचा-