India vs New Zealand A series : भारतीय क्रिकेटपटूंचं (Indian Cricket Team) दुखापतीचं सत्र सुरुच आहे. अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला कोरोनाची बाधा झाल्यामुळं तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेला मुकणार असं समोर आलं असताना आता युवा गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep saini) यालाही दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तो न्यूझीलंड आणि भारत 'अ' संघाच्या सामन्यांना मुकणार आहे. भारताचा 'अ' संघ न्यूझीलंडच्या 'अ' संघाशी 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सामना खेळणार असून संजू संघाचं नेतृत्त्व करणार आहे. या संघात सैनी देखील होता पण आता दुखापतीमुळे तो या सामन्यांना मुकणार आहे.
मोहम्मद शमीला कोरोनाची बाधा झाल्याचं तसंत सैनीच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयनं अधिकृत ट्वीट केलं आहे. यावेळी कोरोनाची बाधा झाल्यामुळे मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी उमेश यादव संघात सामिल झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच सैनीबद्दल माहिती दिली असून यात म्हटलं आहे की, नॉर्थ झोन आणि साऊथ झोन यांच्यातील दुलीप करंडकमधील उपांत्य फेरीच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी सैनीला दुखापत झाली. त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरीत स्पर्धेतून तसंच भारत आणि न्यूझीलंड 'अ' संघातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर पडला आहे. सैनी आता त्याच्या उपचारासाठी नॅशनल क्रिकेट अकादमी अर्थात NCA ला जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे. तसंच रिषी धवन हा सैनीच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध संघात असणार आहे.
शमी आणि सैनी बाहेर गेल्यानंतर भारतीय संघ-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, दीपक चाहर, उमेश यादव.
न्यूझीलंडविरुद्ध सामन्यांसाठी भारत 'अ' संघ
पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईस्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दूल ठाकूर, उम्रान मलिक, राज अंगद बावा, रिषी धवन.
हे देखील वाचा-