T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी(T20 World Cup 2022) आता जवळपास सर्वच देशांनी आपआपले संघ जाहीर केले आहेत. काही वेळापूर्वीच युएईने आपला संघ जाहीर केल्यानंतर आता एकूण 13 देशांनी आपेल संघ जाहीर केले आहेत.  


भारत आणि पाकिस्तान यांनी मागील आठवड्यात संघ जाहीर केल्यावर श्रीलंकेने देखील T20 विश्वचषक स्पर्धेसाठीचा संघ जाहीर केला. T20 विश्वचषक 2022 मध्ये 16 संघ सहभागी होत आहेत, आतापर्यंत 13 देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत, तर 3 देशांनी अद्याप संघ जाहीर केलेला नाही. न्यूझीलंड 20 सप्टेंबरला संघाची घोषणा करेल, अशी माहिती समोर येत आहे. तर आतापर्यंत जाहीर झालेल्या संघावर एक नजर फिरवूया...


भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह


पाकिस्तानचा संघ


बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद आणि उस्मान कादिर.


बांग्लादेशचा संघ


शाकिब अल हसन (कर्णधार), सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, अफिफ हुसैन, मोसादेक हुसैन, लिटन दास, यासिर अली, नूरुल हसन, मुस्तफिजुर रहमान, सैफुद्दीन, तस्कीन अहमद, एबादोत हुसैन, हसन महमूद, नजमुल हुसैन, नसुम अहमद.


अफगानिस्तानचा संघ


मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह ज़दरान, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), अजमतुल्लाह ओमरजई, दरवेश रसूली, फरीद अहमद मलिक, फजल हक फारुकी, हजरतुल्लाह जजई, इब्राहिम जदरान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, कैस अहमद, खान, सलीम सफी, उस्मान गनी.


ऑस्ट्रेलियाचा संघ


आरॉन फिंच (कर्णधार), एश्टन एगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हीड, जोश हेझलवुड, जोश इंगलिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हीड वॉर्नर, एडम झम्पा.


दक्षिण आफ्रिकेचा संघ 


टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, रीजा हँड्रिक्स, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हीड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रेली रोसौव, तबरेज शम्सी, ट्रिस्टन


नामिबीयाचा संघ


गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मिट, दीवान ला कॉक, स्टीफन बार्ड, निकोल लॉफ्टी ईटन, जान फ्रिलिंक, डेविड विसे, रूबेन ट्रम्पेलमॅन, जेन ग्रीन, बर्नार्ड शोल्ट्ज, तांगेनी, लुंगमेनी, मायकल वॅन लिंगेन, बेन शिकोंगो, कार्ल बिरकेनस्टॉक, लोहान लॉरेन्स, हेलो हां फ्रांस


नेदरलँड संघ 


स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन एकरमॅन, शारिज अहमद, लोगान वॅन बीक, टॉम कूपर, ब्रँडन ग्लोवर, टिम वॅन डेर गुगटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीडे, पॉल वॅन मीकेरेन, रोएलोफ वॅन डेर मेर्वे, स्टीफन मायबर्ग, तेजा निदामानुरु, मॅक्स ओ'डॉड, टीम प्रिंगल, विक्रम सिंह.


श्रीलंका संघ 


दासुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वनिन्दु हसरंगा, महेश थीक्षाना, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा (फिटनेस के अधीन), लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन


वेस्ट इंडीज संघ


निकोलस पूरन (कर्णधार), रोवमैन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉनसन चार्ल्स, शेल्डन कॉटरेल, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रैंडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मैककॉय, रेमन रीफर, ओडियन स्मिथ.


झिम्बाब्वेचा संघ


एर्विन क्रेग (कर्णधार), बर्ल रयान, चकबवा रेजिस, चटारा तेंदई, इवांस ब्रैडली, जोंगवे ल्यूक, मदांडे क्लाइव, मधेवेरे वेस्ली, मसाकाद्जा वेलिंगटन, मुन्योंगा टोनी, मुजरबानी ब्लेसिंग, नगारवा रिचर्ड, रजा सिकंदर, शुम्बा मिल्टन, विलियम्स सीन


युएईचा संघ


सीपी रिजवान (कर्णधार), वृत्या अरविंद,  चिराग सूरी, मुहम्मद वसीम, बासिल हमीद, आर्यन लकड़ा, जवार फरीद, काशिफ दाउद, कार्तिक मयप्पन, अहमद रजा, जहूर खान, जुनैद सिद्दीकी, साबिर अली, अलीशान शराफू आणि अयान खान.


टी-20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघ आमने-सामने


टी-20 विश्वचषकात एकूण 16 संघामध्ये स्पर्धा रंगणार आहे. ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, स्कॉटलँड, श्रीलंका, वेस्ट इंडीज, आयर्लंड, यूएई, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेच्या संघाचा समावेश आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या या आठ संघांनी सुपर 12 साठी पात्रता मिळवली आहे. 


कुठे रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा?


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 


हे देखील वाचा-