Continues below advertisement


Russia Earthquake News : रशियाच्या कामचाटका भागात 30 जुलै रोजी सकाळी 8.8 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाल्यानंतर संपूर्ण प्रशांत महासागर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका वाढला असून 12 हून अधिक देशांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभमीवर जपानने फुकुशिमा अणुप्रकल्प तातडीने रिकामा केला आहे. या भागात 60 सेमीपासून 15 फूट उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर आदळताना दिसल्या. जपानला 2011 च्या भयानक त्सुनामीचा अनुभव असल्यामुळे प्रशासन अधिक सतर्क आहे.


या आधी जपानमध्ये आलेल्या त्सुनामीमुळे फुकुशिमा अणुप्रकल्पाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामध्ये हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे जपानने खबरदारी म्हणून हा अणुप्रकल्प रिकामा केला आहे. 


जगभरात त्सुनामीचा धोका: कोणत्या देशांवर परिणाम?


रशिया, जपान, अमेरिका (कॅलिफोर्निया, अलास्का), हवाई, फिलीपिन्स, गुआम, इक्वाडोर, पेरू, चिली, सोलोमन आयलंड्स, नॉर्दर्न मारियाना, न्यूजीलंड


हवाई बेटांच्या समुद्रकिनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, एअरपोर्टही बंद करण्यात आला आहे. चीनमधील शांघायमध्ये 2.8 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे अद्याप त्सुनामीची लाट नोंदवली गेलेली नाही, पण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


धोका किती काळ टिकू शकतो?


Pacific Tsunami Warning Center (PTWC) आणि जपान हवामान एजन्सी (JMA) च्या मते, पुढील 12 ते 30 तास त्सुनामीचा धोका राहू शकतो. त्सुनामी केवळ उंच लाटांमुळेच नव्हे तर त्यांच्या वेग आणि ताकदीमुळेही मोठे नुकसान घडवते.


Tsunami In Pacific Ocean : त्सुनामी किती घातक असते?


- 15 सेमी लाट माणसाला खाली पाडू शकते.


- 60 सेमी लाट गाड्या, दुचाकी वाहून नेऊ शकते.


- 90 सेमी लाट झाडं, वीज खांब, कुंपण कोसळवू शकते.


- त्सुनामीच्या लाटा 700–800 किमी/तास वेगाने किनाऱ्यावर धडकू शकतात.


Tsunami Alert In India : भारताला किती धोका?


सध्या भारतात थेट धोका नसला तरी प्रशांत महासागरातील अस्थिरता लक्षात घेता समुद्रकिनारी असलेल्या देशांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जपानपासून ते हवाईपर्यंत 12 देशांमध्ये त्सुनामीमुळे उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तीव्रता आणि त्सुनामीचा प्रचंड वेग पाहता, प्रशासन आणि नागरिकांनी वेळेत योग्य पावले उचलल्यासच जीवित आणि मालमत्तेची हानी टाळता येईल.



ही बातमी वाचा: