T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाच्या भूमीत 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) रंगणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी दिग्गज खेळाडूंना घेऊन भारतीय संघ देखील ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिथं पोहोचून सराव देखील करत आहे. दरम्यान सरावासोबत काही प्रमाणात एन्जॉयही टीम इंडिया करत आहे.
सरावानंतरच्या फावल्या वेळात भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात सुरु ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड टी20 मालिका पाहण्यासाठी पर्थच्या मैदानात गेल्याचंही दिसून आलं आहे. काही खेळाडूंचे फोटो व्हायरल झाले असून यामध्ये आर आश्विन, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिक यांचा एकत्र बसलेला एक फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. यामध्ये हे सर्वजण पर्थच्या ऑप्टस मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड टी20 सामना पाहत असल्याचं दिसत आहे.
पाहा फोटो-
कसे असेल भारताचे सराव सामन्याचे वेळापत्रक?
विश्वचषक खेळणारे बहुतेक संघ द्विपक्षीय मालिका खेळत आहेत. आगामी टी-20 विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी भारत काही सराव सामने खेळणार आहे. भारत 10 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया इलेव्हनशी भिडणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ब्रिसबेन येथे जातील, जिथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याशी अनुक्रमे 17 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबरला दोन अधिकृत सराव सामने खेळतील.
ऑस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-