Ravichandran Ashwin and Dinesh Karthik : आगामी टी20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2022) वरिष्ठ खेळाडूंना घेऊन टीम इंडिया (Team india) ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. फिनिशर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि स्टार फिरकीपटू आर अश्विनचाही (R Ashwin) या संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान आता दिनेश आणि आश्विनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


यामध्ये दिनेश कार्तिकला आश्विन बॅटिंग टीप्स देताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्लेनमध्ये उभ्या-उभ्या आश्विन कार्तिकला टीप्स देत आहे. या व्हिडिओमध्ये आर अश्विन फ्लाइटच्या आत दिनेश कार्तिकला क्रिकेट क्लास देताना दिसत आहे. आधी दिनेश कार्तिक आश्विनला काहीतरी विचारताना दिसतो, त्यानंतर आश्विन त्याला बॅटिंग शॉट्स सांगू लागतो. दिनेश कार्तिक आश्विनचे ​​हे शॉट्स अतिशय काळजीपूर्वक पाहताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्सनेही हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट केला आहे. याला 'अॅश प्रोफेसर अण्णा' असं कॅप्शनही दिलं आहे.






 


विश्वचषकापूर्वी भारत 4 सराव सामने खेळणार 


टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध मेलबर्न इथं होणार आहे. टीम इंडिया आधी पर्थला पोहोचेल. 13 तारखेपर्यंत इथे सराव शिबिर होणार आहे. यादरम्यान दोन सराव सामनेही खेळवले जाणार आहेत. हे दोन्ही सराव सामने बीसीसीआयनेच आयोजित केले आहेत, जे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवले जातील. हे दोन्ही सामने 10 आणि 12 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. यानंतर भारतीय संघाला ब्रिस्बेनमध्ये दोन आयसीसी सराव सामनेही खेळायचे आहेत. हे दोन्ही आयसीसी सराव सामने 17 आणि 19 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळवले जाणार आहेत. 


हे देखील वाचा-