T20 World Cup Points Table: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील संघ दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. गट 'अ' मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.  तर भारत, पाकिस्तान, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड हे गट 'ब' मध्ये आहेत. सुपर-12 फेरीत प्रत्येक संघ त्यांच्या गटातील पाच संघाविरुद्ध एक सामना खेळेल. या दोन्ही गटांत अव्वल स्थानी असलेल्या दोन संघांना पुढील फेरीत प्रवेश मिळेल. म्हणजेच, एकूण चार संघामध्ये उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि उर्वरीत आठ संघाला आपलं सामान गुंडाळावं लागेल.

सुपर-12 'अ' गट
सुपर- 12 च्या 'अ' गटात न्यूझीलंड अव्वल स्थानी आहे. तर, इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडच्या संघानं सुपर -12 च्या सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभवाची धुळ चारली. दुसरीकडं इंग्लंडच्या संघानं अफगाणिस्तानचा मोठ्या फरकानं पराभव केला. विशेष म्हणजे, या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर आहे. 

क्रमांक संघ सामने विजय पराभव गुण नेट रनरेट
1 न्यूझीलंड 1 1 0 2 4.450
2 इंग्लंड 1 1 0 2 0.620
3 श्रीलंका 2 1 1 2 0.450
4 ऑस्ट्रेलिया 2 1 1 2 -1.555
5 अफगाणिस्तान 1 0 1 0 0.620
6 आयर्लंड 1 0 1 0 -2.467

 

सुपर-12 'ब' गट
 बांगलादेश गट 'ब' मध्ये पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेश संघानं पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला होता. तर, भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला होता. तर, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, झिम्बाब्वे चौथ्या, पाकिस्तान पाचव्या आणि नेदरलँड्सचा संघ सहाव्या स्थानावर आहे. 

 

क्रमांक संघ सामने विजय पराभव गुण नेट रनरेट
1 बांग्लादेश 1 1 0 2 0.450
2 भारत 1 1 0 2 0.050
3 दक्षिण आफ्रिका 1 0 0 1 -
4 झिम्बाब्वे 1 0 0 1 -
5 पाकिस्तान  1 0 1 0 -0.050
6 नेदरलँड्स 1 0 1 0 -0.450

हे देखील वाचा-