T20 World Cup Points Table: टी-20 विश्वचषकातील सुपर-12 फेरीतील आपल्या चौथ्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह भारतानं टी-20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतलीय.  टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील संघ दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. गट 'अ' मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.  तर भारत, पाकिस्तान, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड हे गट 'ब' मध्ये आहेत. सुपर-12 फेरीत प्रत्येक संघ त्यांच्या गटातील पाच संघाविरुद्ध एक सामना खेळेल. या दोन्ही गटांत अव्वल स्थानी असलेल्या दोन संघांना पुढील फेरीत प्रवेश मिळेल. म्हणजेच, एकूण चार संघामध्ये उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि उर्वरीत आठ संघाला आपलं सामान गुंडाळावं लागेल.

सुपर-12 'अ' गट
सुपर- 12 च्या 'अ' गटात न्यूझीलंड अव्वल स्थानी आहे. तर, इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लडनं तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवलाय. त्यानंतर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर, श्रीलंकेचा संघ चौथ्या क्रमांकावर,  आयर्लंड पाचव्या क्रमांकावर आणि अफगाणिस्तानचा संघ सहाव्या स्थानावर आहे. 

 

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 न्यूझीलंड 4 2 1 1 5 +2.233
2 इंग्लंड 4 2 1 1 5 +0.547
3 ऑस्ट्रेलिया 4 2 1 1 5 -0.304
4 श्रीलंका 4 2 2 0 4 -0.457
5 आयर्लंड 4 2 1 0 2 1.544
6 अफगाणिस्तान 4 0 2 2 2 -0.718

 

सुपर-12 'ब' गट
भारत गट 'ब' मध्ये पहिल्या स्थानावर आहे. भारतानं चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका हा एकमेव संघ ज्यानं या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. त्यानंतर बांगलादेशचा संघ तिसऱ्या क्रमांकावर, झिम्बाब्वे चौथ्या क्रमांकावर, पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आणि नेदरलँड्सचा संघ सहाव्या आणि गुणतालिकेच्या तळाशी आहे. 

 

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 भारत 4 3 1 0 6 +0.730
2 दक्षिण आफ्रिका 3 2 0 1 5 +2.772
3 बांगलादेश 4 2 2 0 4 -1.276
4 झिम्बाब्वे 4 1 2 1 2 -0.313
5 पाकिस्तान 3 1 2 0 2 +0.765
6 नेदरलँड्स 4 1 3 0 2 -1.233

हे देखील वाचा-