AUS vs AFG, T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup 2022) गतविजेता ऑस्ट्रेलिया आपल्या गटात 5 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयर्लंडविरुद्ध झालेल्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 42 धावांनी विजय मिळवला होता. पण याच सामन्यात कर्णधार अॅरॉन फिंच, अष्टपैलू टीम डेव्हिड आणि मार्कस स्टॉयनिस हे तिघेही दुखापतग्रस्त झाले. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला तीन मोठे धक्के बसले असून आता आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात या तिघांचं खेळणं अवघड झालं आहे. ज्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची संकटं वाढली आहेत.
दुखापत झालेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंच तसंच अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आणि टीम डेव्हिड हे दोन्ही अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. तिन्ही खेळाडूंना दुखापत झाली असून बुधवारी, फिंचची फिटनेस टेस्ट घेण्यात आली. दरम्यान त्याला हॅमस्ट्रींगचा त्रास असून आहे. त्याने आयर्लंविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर याबाबत स्वत:च सांगतिलं होतं. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात फिंच खेळू शकला नाही, तर यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड संघाचे कर्णधारपद सांभाळेल. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातही फिंचनंतर वेडने संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्याचवेळी अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात फिंचच्या जागी संघाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन सलामीला येऊ शकतो. दरम्यान डेव्हीड आणि स्टॉयनिस हे मात्र अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ऑस्ट्रेलियासाठी विजय महत्त्वाचा
अफगाणिस्तानच्या संघाने आतापर्यंत एकही सामना जिंकला नसल्याने त्याचं आव्हान संपलं आहे. पण ऑस्ट्रेलिया मात्र अजून स्पर्धेत असून त्यांना हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना शुक्रवारी अर्थात 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. सध्या ऑस्ट्रेलिया पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कशी आहे ग्रुप 1 ची गुणतालिका?
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | गुण | नेट रनरेट |
1 | भारत | 4 | 3 | 1 | 0 | 6 | +0.730 |
2 | दक्षिण आफ्रिका | 3 | 2 | 0 | 1 | 5 | +2.772 |
3 | बांगलादेश | 4 | 2 | 2 | 0 | 4 | -1.276 |
4 | झिम्बाब्वे | 4 | 1 | 2 | 1 | 2 | -0.313 |
5 | पाकिस्तान | 3 | 1 | 2 | 0 | 2 | +0.765 |
6 | नेदरलँड्स | 4 | 1 | 3 | 0 | 2 | -1.233 |
हे देखील वाचा-
IND vs BAN : पावसाच्या व्यत्ययानंतर सामना पुन्हा सुरु, बांगलादेशला 16 षटकात कराव्या लागणार 151 धावा