PAK vs ZIM T20 world cup 2022:  पाकिस्तानविरुद्ध थरारक सामन्यात झिम्बावेच्या संघानं अवघ्या एका धावेनं विजय मिळवलाय. पर्थ स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानसमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची दमछाक झाली. अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या संघाला 11 धावांची आवश्यकता वेगवान गोलंदाज ब्रॅड इव्हान्सनं भेदक गोलंदाजी करत झिम्बाब्वेच्या संघाला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असल्याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं.


ट्वीट-






 


झिम्बाब्वेचं पाकिस्तानसमोर 131 धावांचं आव्हान
या सामन्यात नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलं. झिम्बाब्वेकडून सेन विल्यम्सनं सर्वाधिक 31 धावांची खेळी केली.पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनिअर उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानं या सामन्यातील चार षटकात 24 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर शादाब खाननं तीन विकेट्स घेतल्या. तर,हारिफ रौफच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली. 


झिम्बाब्वेचा अवघ्या धावेनं विजय
दरम्यान, 131 धावांचं लक्ष्य रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले. बाबर आझम आणि रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्वतःला सावरू शकला नाही. अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना पाकिस्तानच्या संघाला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवामुळं पाकिस्तानची टी-20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता वाढलीय.


सिकंदर रझा सामनावीर
पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या सिंकदर रझाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. या सामन्यात सिकंदर रझानं चार षटकात 25 धावा खर्च देऊन तीन विकेट्स घेतल्या. तर, ब्रॅड इव्हंसच्या खात्यात दोन विकेट्स जमा झाल्या. याशिवाय, मुझारबनी आणि जोन्ग्वे यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


हे देखील वाचा-