T20 World Cup 2022 Records: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातील जवळपास अर्धा टप्पा पूर्ण होत आलाय. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केलंय. यंदाच्या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत श्रीलंकेचा फलंदाज कुशल मेंडिस अव्वल स्थानी आहे. तर, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत नेदरलँड्सचा गोलंदाज बास डी लीडे आघाडीवर आहे. महत्वाचे म्हणजे, श्रीलंका नेदरलँड्स, आयर्लंड आणि झिम्बाब्वेच्या संघानं सुपर 12 फेरीपूर्वी प्रत्येकी तीन-तीन सामने इतर संघापेक्षा अधिक खेळले आहेत. दरम्यान, या स्पर्धेत सर्वाधिक षटकार, चौकारपासून तर कोणत्या संघानं मोठा विजय मिळवला यासह टी-20 विश्वचषकातील 10 मोठ्या विक्रमांवर नजर टाकुयात.


टी-20 विश्वचषकातील 10 मोठे विक्रम-


1) सर्वोच्च धावसंख्या:
 या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं बांगलादेशविरुद्ध 20 षटकात पाच विकेट्स गमावून 205 धावांचा डोंगर उभा केला होता. 


2) सर्वात मोठा विजय
 दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 205 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाचा डाव अवघ्या 101 धावांवर आटोपला. हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 104 धावांनी जिंकला. या स्पर्धेतील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय आहे. 


3) सर्वाधिक धावा
श्रीलंकेचा सलामीवीर कुशल मेंडिसनं 44 च्या सरासरीनं आणि 157.1 च्या स्ट्राईक रेटनं पाच डावात 176 धावा केल्या आहेत. या कामगिरीसह टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तो टॉपवर आहे.


4) सर्वोत्तम खेळी
दक्षिण आफ्रिकेच्या रिले रोसोनं बांगलादेशविरुद्ध 109 धावांची खेळी केली.  रिले रोसोची ही खेळी यंदाच्या टी-20 विश्वचषकातील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. 


5) सर्वाधिक षटकार
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रिली रोसोच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोंद आहे. त्यानं आतापर्यंत 8 षटकार मारले आहेत.


6) सर्वाधिक विकेट्स
 नेदरलँडचा गोलंदाज बास डी लीडेनं 5 डावात 9 विकेट घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी 14.44 आणि इकॉनॉमी रेट 8.66 इतका आहे.


7) सर्वोत्तम गोलंदाजी
 इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करननं अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 3.4 षटकात 10 धावा देऊन पाच विकेट्स घेतले आहेत.


8) सर्वोत्कृष्ट विकेटकीपिंग:
इंग्लंडच्या जोस बटलरने विकेटमागं पाच विकेट्स घेतल्या.


9) सर्वोच्च भागीदारी
रिली रोसो आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक यांनी बांगलादेशविरुद्ध 168 धावांची भागीदारी केली.


10) सर्वाधिक झेल:
आयरिश खेळाडू मार्क एडरनं पाच सामन्यात सर्वाधिक चार झेल घेतले आहेत. 


हे देखील वाचा-