Pakistan Chances to reach Semifinal : सध्या टी20 क्रिकेटमध्ये एक अव्वल दर्जाचा बोलिंग अटॅक असूनही पाकिस्तान (Team Pakistan) संघाला टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) खास कामगिरी करता आलेली नाही. आधी भारत आणि मग झिम्बाब्वे अशा दोन्ही संघाकडून पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ग्रुप 1 च्या पाँईंट्स टेबलमध्येही पाकिस्तान 6 पैकी 5 व्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणं तसं अवघडचं आहे. पण असं असलं तरी पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये पोहोचणं अजूनही शक्य आहे, पाकिस्तानचा सेमीफायनलचं तिकीट भारताच्या खेळीवर अवंलंबून असून नेमकं गणित कसं आहे जाणून घेऊ...

पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना त्यांचे उर्वरीत सामने अगदी मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. ज्याने त्यांचा नेट रनरेट वाढेल. तसंच भारताशिवाय ग्रुप 1 मधील इतर संघानी खराब कामगिरी केल्यास पाकिस्तानला फायदा होईल. सर्वात आधी भारताला दक्षिण आफ्रिकेसह इतर सर्व सामने जिंकावे लागतील. तसंच बांग्लादेशला एक आणि झिम्बाब्वेसह दक्षिण आफ्रिकेला किमान दोन सामने गमावावे लागतील आणि असं सर्व झाल्यास पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे चान्सेस आहेत. त्यात ग्रुप 1 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका दमदार फॉर्मात असून झिम्बाब्वेही चांगली खेळी करतान दिसत आहे. त्यामुळे आधीच या तिघांमध्ये चुरस असल्याने पाकिस्तानचं सेमीमध्ये पोहोचणं अत्यंत अवघड आहे. तर नेमकी ग्रुप 1 ची गुणतालिका कशी आहे पाहूया... 

असा आहे ग्रुप 2 चा पॉईंट टेबल

संघ सामने विजय पराभव गुण नेट रन रेट
भारत 2 2 0 4 1.425
दक्षिण आफ्रिका 1 0 3 5.200
झिम्बाब्वे 2 1 0 3 0.050
बांग्लादेश 2 1 1 2 -2.375
पाकिस्तान 2 0 2 0 -0.050
नेदरलँड 2 0 2 0 -1.625

हे देखील वाचा-