T20 World Cup 2022: अॅडिलेड येथे खेळण्यात आलेल्या सुपर 12 फेरीतील आपल्या चौथ्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा पाच धावांनी (IND vs BAN) पराभव केला. या विजयासह गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी पोहचलाय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रित केलं. त्यानंतर भारतानं निर्धारित 20 षटकात सहा विकेट्स गमावून बांगलादेशसमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरात बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासनं (Litton Das) वादळी अर्धशतकी खेळी करत सामना बांगलादेशच्या बाजून झुकवला. बांगलादेशच्या डावातील आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलनं डिप मिड विकेटवरून डायरेक्ट थ्रो करत लिटन दासचा डाव संपुष्टात आणला, जो सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. 


केएल राहुलचा डायरेक्ट हिट-






 


भारताचं बांगलादेशसमोर 185 धावांचं लक्ष्य
या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारताला कमी धावात रोखण्याचा बांगलादेशच्या संघाचा प्लॅन होता. त्यानंतर रोहित शर्माला अवघ्या दोन धावांवर बाद करत बांगलादेशच्या गोलंदाजांनी कर्णधार शाकीब उल हसनचा निर्णय योग्य ठरवला.मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलनं आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली.दरम्यान, दहाव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुल 50 धावांवर बाद झाला. सूर्यकुमारनं 30 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि दिनेश कार्तिक स्वस्तात माघारी परतले. अखेर आश्विननं सहा बॉलमध्ये नाबाद 12 महत्त्वपूर्ण धावा केल्या दुसरीकडे विराट कोहलीच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर भारतानं बांगलादेश समोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं.


अन् लिटन दासची वादळी खेळी थांबली
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासनं भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढवली. या सामन्यात लिटन दासनं अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक ठोकून आपली भूमिका स्पष्ट केली. ज्या प्रकारे लिटन दास फलंदाजी करत, हे पाहता बांगलादेशचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. दरम्यान, बांगलादेशच्या डावातील सातव्या षटकात पावसानं हजेरी लावली. त्यानंतर बांगलादेशसमोर 16 षटकात 151 धावांचं लक्ष्य दिलं गेलं. मात्र, आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शांन्तोनं मिड विकेट्सच्या दिशेनं फटका मारला. परंतु, दोन धावा काढण्याचा प्रयत्नात लिटन दास केएल राहुलच्या डायरेक्ट थ्रोचा शिकार ठरला. 


हे देखील वाचा-