IND vs NED, Viral Video : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा ऑस्ट्रेलियात सुरु आहे. भारताने स्पर्धेची सुरुवात दमदार पद्धतीने केली असून पाकिस्ताननंतर आता नेदरलँडवरही (IND vs NED) विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध नेदरलँड सामना सिडनी येथे नुकताच पार पडला. या सामन्यात भारतानं नेदरलँडवर 56 धावांनी विजय मिळवत मैदान मारलंच पण सोबतच एका भारतीय चाहत्याने प्रेमाचं मैदानही मारलं आहे. एका टीम इंडियाच्या फॅनने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आयसीसीने (ICC) स्वत: त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
विशेष म्हणजे तरुणाने तरुणीला प्रपोज केल्यावर तिने होकारही दिला. त्यामुळे आयसीसीने व्हिडीओ टाकताना त्याला 'ती हो म्हणाली' असं कॅप्शनही दिलं आहे. तसंच या व्हिडीओवर निर्णय बाकी आहे, असं मजेशीर टेक्स दिलं असून एखाद्या थर्ड अंपायर डिसीजनची वाट जशी क्रिकेटप्रेमी स्क्रिनवर पाहतात तशाच भावना हा व्हिडीओ पाहून येत आहेत. तर हा व्हिडीओ तुम्हीही पाहू शकता...
पाहा VIDEO
प्रेमाच्या मैदानात फॅनचा तर क्रिकेटच्या मैदानात भारताचा विजय
भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात टीम इंडियानं जबरदस्त प्रदर्शन दाखवलं. एका मोठ्या धावसंख्येच्या फरकाने भारताने सामना जिंकला आहे. सामन्यात भारतानं आधी फलंदाजी करत 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यामध्ये रोहित, विराटसह सूर्यकुमारनं अर्धशतक झळकावलं. ज्यानंतर नेदरलँड संघाला 123 धावांत रोखलं, ज्यामुळे 56 धावांनी सामना भारताने जिंकला आहे. फलंदाजाच्या दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत नेदरलँडची धावसंख्या अधिक होऊ दिली नाही. या विजयासह भारत ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे.
हे देखील वाचा-