Who Is Vikramjit Singh: भारतीय संघ आज नेदरलँड्सविरुद्ध (India vs Netherlands) टी-20 विश्वचषकातील दुसरा सामना खेळतोय. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) हा सामना खेळला जातोय. भारताविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये नेदरलँड्सच्या संघात विक्रमजीत सिंहच्या नावाचाही समावेश आहे. 19 वर्षीय विक्रमजीत सिंह नेदरलँड्सच्या संघाचा सलामी फलंदाज आहे. विक्रमजीत सिंह मूळ पंजाबचा असून तो अवघ्या पाच वर्षाचा असताना त्यांच्या वडिलांनी पंजाब सोडलं होतं. 1980 च्या दशकात विक्रमजीतचे आजोबा खुशी चीमा यांनी पंजाबमधील वाढत्या बंडखोरीमुळं पंजाब सोडण्याचा निर्णय घेतला.


विक्रमजीत सिंहचे वडील काय म्हणाले?
विक्रमजीत सिंह फक्त 5 वर्षांचा होता, तेव्हा डिसेंबर 1984 च्या एका रात्री त्याचे हरप्रीत जालंधरजवळील चीमा खुर्द गावातून अचानक निघून गेले.  "मी ती रात्र आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ कधीही विसरू शकत नाही. पंजाबमधील वाढत्या बंडामुळं माझ्या वडिलांनी आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी गाव सोडलं होतं, असं हरप्रीत सिंह इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले होते. 


नेदरलँड्समध्ये गेल्यानंतरही संघर्ष सुरुच
 पुढे विक्रमजीतचे वडील म्हणाले की, 'मी जेव्हा नेदरलँडला गेलो, तेव्हा सुरुवातीला खूप अडचणींचा सामना करावा लागला. भाषा आणि संस्कृती पूर्णपणे भिन्न होती. मला जुळवून घ्यायला बरीच वर्षे लागली. मग त्या काळात येथे वंशवादही चालायचा. माझ्या त्वचेचा रंग, दाढी आणि पगडी यामुळं मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पण हळूहळू गोष्टी चांगल्या होत गेल्या.


विक्रमजीत सिंहचे आजोबा पंजाबला परतले
खुशी चीमा पंजाबमधून नेदरलँडमध्ये आल्यावर त्यांनी येथे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी काढली. आता हरप्रीत ही कंपनी चालवतो. त्यानंतर 2000 साली खुशी चीमा पुन्हा  पंजाबमधील त्यांच्या मूळ गावी परतले.


वयाच्या 15व्या वर्षी नेदरलँड्स 'अ' संघात सामील
विक्रमजीतचा जन्मही त्यांच्या मूळ गावी चीमा खुर्द येथे झालाय. वयाच्या अकराव्या वर्षी नेदरलँड्समध्ये झालेल्या 12 वर्षांखालील स्पर्धेत तत्कालीन डच कर्णधार पीटर बोरेननं त्याची क्षमता ओळखली. वीक्रमजीत सिंह वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी नेदरलँड्स अ संघात सामील झाला. यावेळी त्याला नेदरलँड्सच्या टी-20 विश्वचषक संघाचा भाग बनण्याची संधी मिळाली.  तो आज टीम इंडियाविरुद्ध नेदरलँड्सच्या संघाचं प्रतिनिधित्व करत आहे.


हे देखील वाचा-