T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात सेमीफायनलचं तिकीट मिळवणाऱ्या संघाची नाव स्पष्ट झाली आहेत. सुपर 12 फेरीतील 'अ' गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर, 'ब' गटातून भारतानंतर पाकस्तानच्या संघानंही सेमीफायनलमध्ये धडक दिली. सेमीफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी आणि पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यापूर्वी यंदाच्या टी-20 विश्वचषकात फ्लॉप ठरलेल्या पाच कर्णधारांच्या कामगिरीवर एक नजर टाकुयात. या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर, टेम्बा बावुमा यांसारखी अनेक आश्चर्यचकीत करणारी नावे आहेत.
टी-20 विश्वचषकात फ्लॉप ठरलेले कर्णधार-
1) बाबर आझम:
पाकिस्तानचा संघ टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहचला असला तरी त्यांचा कर्णधार बाबर आझम मैदानात संघर्ष करताना दिसतोय. या स्पर्धेत बाबर आझमला पाच सामन्यात फक्त 39 धावा करता आल्या. पाकिस्तानचा संपूर्ण संघ कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवानवर अवलंबून असल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. बाबरचा फ्लॉप फॉर्म पाकिस्तानच्या संघासाठी डोकेदुखी ठरत आहे.
2) शाकीब अल हसन:
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभूत करून बांगलादेशच्या संघाला सेमीफायनलचं तिकीट मिळवण्याची संधी उपलब्ध झाली होती. परंतु, बांगलादेशच्या संघानं ही संधी गमावली. या स्पर्धेत बांगलादेशचा कर्धार शकीब अल हसननं निराशाजनक कामगिरी करून दाखवली. शाकीबनं पाच सामन्यात 8.80 च्या सरासरीनं फक्त 44 धावा केल्या आहेत.
3) टेम्बा बावुमा:
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, अखेरच्या दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानं दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान, या स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या कर्णधाराच्या यादीत टेम्बा बावुमाचंही नाव आहे. त्यानं पाच सामन्यात 17.50 च्या सरासरीनं फक्त 70 धावा केल्या आहेत.
4) दासून शनाका:
टी-20 विश्वचषकात खराब कामगिरी करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत श्रीलंकेचा कर्णधार दासून निसांका याचंही नाव आहे. या स्पर्धेत दासून शनाका सात सामन्यात 13.00 च्या सरासरीनं फक्त 78 धावा करता आल्या आहेत.
5) रोहित शर्मा:
यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारताचा कर्णधार रोहित शर्माची बॅट शांत दिसली. या स्पर्धेत रोहित शर्मानं पाच सामन्यात 17.80 च्या सरासरीनं फक्त 89 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-