England vs Pakistan T20 World Cup 2022: पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव करत इंग्लंडने विश्वचषक पटकावला. या विजयासह इंग्लंडने दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात तीन विकेट घेणाऱ्या सॅम करनला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याशिवाय त्याला मालिकावीर पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. सॅम करन याने विश्वचषकात 11.38 च्या सरासरीनं 13 विकेट्स घेतल्या आहेत. तर फायनलमध्ये सॅम करन याने 12 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे सॅमला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलेय.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि पाकिस्तानचा कर्णदार बाबर आझम यांनी 'प्लेयर ऑफ द सीरीज' कोण होईल, याचा अंदाज वर्तवला होता. विशेष म्हणजे, या दोन्ही कर्णधारांनी सॅम करन याचे नाव घेतलं नव्हतं. जोस बटलरच्या मते सूर्यकुमार यादव याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' मिळेल. तर बाबरने शादाब खानचे नाव घेतलं होतं.
जोस बटलर सूर्यकुमार यादवला मनतोय 'प्लेअर ऑफ द सीरीज'
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी म्हटले होते की, ‘भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव कोणत्याही दबावाशिवाय चौफेर फटकेबाजी करतो. माझ्यासाठी सूर्यकुमार यादव प्लेअर ऑफ द टूर्नामेंट आहे. अनेक दिग्गजांच्या स्पर्धेत सूर्यकुमार यादवने छाप सोडली आहे.
बाबर आझम काय म्हणाला?
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, ‘शादाब खान ज्यापद्धतीने विश्वचषकात खेळलाय, त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट मिळायला हवं. शादाबने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आपलं कौशल्य दाखवलं आहे. त्याशिवाय मागील तीन सामन्यात त्यानं दर्जेदार फिल्डिंग केली आहे.
पाँटिंगच्या मते विराटच मालिकावीर -
विराट कोहलीनं विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. माझ्यासाठी या विश्वचषकातील मालिकावीर विराट कोहली आहे. तर सॅम करन विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे, असे रिकी पाँटिंग म्हणाला आहे. विराट कोहलीनं यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. भारतीय संघाचं उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आले, पण विराट कोहलीच्या कामगिरीनं सर्वांचीच मनं जिंकली आहे. सोशल मीडियावर विराटच्या कामगिरीचं कौतुक होत आहे.
विराट कोहलीचं विश्वचषकातील प्रदर्शन -
विराट कोहलीनं यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढल्या आहेत. विराट कोहलीनं सहा डावात चार अर्धशतकासह 296 धावांचा पाऊस पाडला आहे.
हे देखील वाचा-