SL vs AFG, T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या गाबा मैदानात श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघामध्ये (SL vs AFG) सामना पार पडला. अफगाणिस्तानने हा सामना गमावल्यामुळे टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या सेमीफायनलच्या शर्यतीतून भारत बाहेर पडला आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने अफगाणिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 8 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 19 व्या षटकात केवळ 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. श्रीलंकेकडून सर्वोत्तम गोलंदाजी करत तीन विकेट्स घेणाऱ्या वानिंदू हसरंगाला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं.


सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत अफगाणिस्तान संघाने (Afghanistan Team) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. अफगाणिस्तान संघाच्या पहिल्या फळीतील फलंदाजांना डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण पहिले तिन्ही फलंदाज अनुक्रमे 28, 27 आणि 22 धवा करुन बाद झाले. गुरबाजने सर्वाधिक 28 धावा केल्या. त्यानंतर मात्र इतर फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. याउलट श्रीलंकेचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते. ज्यामुळे 20 षटकांत अफगाणिस्तानने 8 गडी गमावून 144 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. 145 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाचे सलामीवीर पाथुम 10 आणि मेंडीस 25 धावा करुन बाद झाले. पण धनंजया डिसिल्वाने नाबाद 66 धावांची तुफान खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. असलांकाने 19 आणि भानुकाने 18 धावांची खेळी करत संघाचा विजय पक्का करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. ज्यामुळे 18.3 षटकांतच केवळ 4 गडी गमावून श्रीलंका संघानं 148 रन करत सामना 6 गडी राखून जिंकला.


अफगाणिस्तान सेमीफायनल शर्यतीतून बाहेर


अफगाणिस्तान संघाच्या आजच्या पराभवामुळे ते सेमीफायनलच्या (World Cup Semifinal) शर्यतीतून बाहेर झाले आहेत. कारण आतापर्यंत त्यांचे 4 सामने झाले असून एकातही त्यांनी विजय मिळवलेला नाही. दोन सामने त्यांनी गमावले असून 2 सामने अनिर्णीत सुटल्यामुळे त्यांना 2 गुण मिळाले आहेत. पण इतर संघाच्या तुलनेत ते गुणतालिकेत फारच खाली असल्याने त्यांचं सेमीफायनलमध्ये पोहोचणं आता जवळपास अशक्यचं आहे.


हे देखील वाचा