Bangladesh vs South Africa : यंदाच्या विश्वचषकात (World Cup 2023) टीम इंडिया (Team India) ची 'लयभारी' कामगिरी पाहायली मिळत आहे. भारताचा (India Cricketer) स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. विराट कोहली हा जगातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. 'रन मशीन' विराट कोहलीने अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दरम्यान, बांगलादेशच्या एका खेळाडूने विराटचा विक्रम मोडला आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan Surpasses Virat Kohli) यानं कोहलीला मागे टाकलं आहे.


शाकिब अल हसननं कोहलीचा विक्रम मोडला


एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) च्या 38व्या सामन्यात शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) ने श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanke) शानदार खेळी केली. शाकिब अल हसनने 65 चेंडूत शानदार 82 धावा केल्या. यावेळी त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले. या दमदार खेळीसह त्याने विराट कोहली (Virat Kohli) चा विक्रम मोडला आहे. शाकिब अल हसनचं विश्वचषकातील हे 11 वे अर्धशतक ठरलं. यासह तो विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. शाकिबने विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराट कोहलीने एकदिवसीय विश्वचषकामध्ये आतापर्यंत 10 अर्धशतके केली आहेत. त्याला मागे टाकत आता या यादीत शाकिब दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल आहे, त्याच्या नावावर 15 अर्धशतकं आहेत.


एकदिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक अर्धशतके



  • सचिन तेंडुलकर - 15 अर्धशतके

  • शाकिब अल हसन - 11 अर्धशतके

  • विराट कोहली - 10 अर्धशतके


एकदिवसीय विश्वचषकात 50+ ची सर्वोच्च धावसंख्या



  • 21 वेळा - सचिन तेंडुलकर (44 डाव) (Sachin Tendulkar)

  • 14 वेळा - विराट कोहली (34 डाव) (Virat Kolhi)

  • 13 वेळा - शकिब अल हसन (36 डाव) (Shakib Al Hasan)

  • 12 वेळा - कुमार संगकारा (35 डाव) (Kumar Sangakkara)

  • 12 वेळा - रोहित शर्मा (25 डाव) (Rohit Sharma)


विश्वचषकात शाकिब अल हसनचा विक्रम


शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हा बांगलादेशचा विश्वचषकातील (World Cup 2023) सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. विश्वचषकात 36 सामने खेळताना त्याने 1332 धावा केल्या आहेत. विश्वचषकातही त्याने 2 शतके झळकावली आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


World Cup 2023 : तर टीम इंडियाचा सेमीफायनल सामना वानखेडेवर नाही, कोलकातामध्ये होणार; पण नेमकं कारण काय?