T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स (South Africa vs Netherlands) यांच्यात झाला. अॅडिलेड ओव्हल येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात नेदरलँड्सच्या संघानं दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेच्या संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून पाकिस्तानसाठी (Pakistan) सेमीफायनलचे दरवाजे उघडले आहेत.

नेदरलँड्स यांच्यातील सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. तर, भारतीय संघ सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानंतर पाकिस्तान तिसऱ्या आणि बांग्लादेशचा संघ चौथ्या क्रमांकावर होता. पाकिस्तान आणि बांग्लादेश यांचे प्रत्येकी चार-चार गुण आहेत. यामुळं पाकिस्तानच्या संघाला सेमीफायनलचं तिकीट नेदरलँड-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यावर अवलंबून होतं. दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँड्सविरुद्ध सामना जिंकला असता तर, पाकिस्तानचा सेमीफायनल गाठण्याचा मार्ग खडतर झाला असता. परंतु, नेदरलँड्सकडून मिळालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडलाय.दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर भारतानं सेमीफायनमध्ये धडक दिली असून दुसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात शर्यत लागली आहे. पाकिस्तान- बांगलादेश यांच्यातील सामना जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये पोहचेल.

ट्वीट-

 

सुपर 12 फेरीतील 'ब' गटातील गुणतालिका-

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 भारत 4 3 1 0 6 +0.730
2 दक्षिण आफ्रिका 5 2 2 1 5 +0.864
3 पाकिस्तान 4 2 2 0 4 +1.117
4 नेदरलँड्स 5 2 3 0 2 -0.849
5 बांगलादेश 4 2 2 0 2 +1.276
6 झिम्बाब्वे 4 1 2 1 2 -0.313

 

हे देखील वाचा