Pakistan 2022 T20 World Cup Squad : ऑस्ट्रेलियात रंगाणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात उतरणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं तीन राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे. पाकिस्तान संघाने फखर जमानला डच्चू दिला आहे. फखर जमानला राखीव खेळाडूमध्ये स्थान दिलेय.
फखर जमानला डच्चू, राखीव खेळाडू म्हणून निवड -
संयुक्त अरब अमीरातमध्ये पार पडलेल्या आशिया चषकात फखर जमानला लौकिकास साजेशी खेळी करता आली नव्हता. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात त्याला 15 जणांमध्ये स्थान देण्यात आले नाही. फखर जमानला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यासोबत मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी यांनाही राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. फखर जमान दुखापतग्रस्त असल्यामुळे अंतिम 15 मध्ये स्थान देण्यात आलं नसल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं आहे.
शाहीन अफ्रिदीचं पुनरागमन, शाम मसदूलाही स्थान -
दुखापतीमुळे आशिया चषक खेळू न शकणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीचं पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झालेय. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी शाहीन शाह आफ्रिदीची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या शाम मसदूलाही स्थान देण्यात आलेय. आसिफ अली, हैदर अली आणि इफ्तिखार अहमद यांनाही अंतिम 15 जणांच्या संघात स्थान देण्यात आलेय.
2022 टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद आणि उस्मान कादिर
राखीव खेळाडू - फखर जमान, मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी
हे देखील वाचा-