NZ vs PAK, T20 World Cup 2022: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज सिडनीच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टी-20 विश्वचषकातील पहिला सेमीफायनल सामना खेळला जातोय. या या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघाला प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण दिलंय. या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसलाय. तर, या स्पर्धेतील दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानच्या संघानंही जोरदार कमबॅक केलंय. यामुळं न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अतिशय रोमहर्षक ठरण्याची शक्यता आहे. 


न्यूझीलंडचा संघानं ग्रुप 1 मधील पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलचं तिकीट मिळवलं. या स्पर्धेतील न्यूझीलंडच्या संघानं एकच सामना गमावला तर, त्यांचा एक सामना अनिर्णित ठरला होता. दुसरीकडं पाकिस्तानच्या संघानंही ग्रुप 2 मधील तीन सामने जिंकले आहेत. परंतु, दोन सामन्यात पाकस्तानच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होत. 


कधी, कुठं रंगणार सामना?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला सेमीफानयल सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.


सेमीफायनल सामन्यांवेळी पाऊस आला तर?
सेमीफायनल सामन्यांदरम्यान पावसाने कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे पावसामुळे नियोजित सेमीफायनल आणि फायनलच्या दिवशी मॅचचा निकाल येऊ शकला नाही, तर सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत 9 नोव्हेंबरला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि 10 नोव्हेंबरला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना होणार असून जर या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पावसाने अडथळा निर्माण केला तर हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी पूर्ण केला जाऊ शकतो.


संघ-


न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.


पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन
मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.


हे देखील वाचा-