FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 92 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडला (England Football Team) फक्त एकदाच चॅम्पियन बनता आलं. इंग्लंडनं 1966 मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 56 वर्षात इंग्लंड एकदाही फिफा विश्वचषक स्पर्धा जिंकता आली नाही. गेल्या विश्वचषकात इंग्लंडनं उपांत्य फेरी गाठून काही आशा उंचावल्या होत्या. परंतु, अंतिम फेरी गाठण्यात त्यांना अपयश आलं. 

इंग्लंडची जबरदस्त कामगिरी
दरम्यान, 2018 च्या फिफा विश्वचषकापासून आतापर्यंत इंग्लंडच्या संघानं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. इंग्लंडनं गेल्या वर्षी युरो चषकात अंतिम फेरी गाठली होती. परंतु, या सामन्यात इंग्लंडला इटलीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, इंग्लंडचे मॅनेजर गॅरेथ साउथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा इंग्लंडला फिफा विश्वचषक विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानलं जात आहे.इंग्लंडच्या यंदाच्या फिफा फुटबॉल संघात स्टार खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. गेल्या काही वर्षांत या संघाच्या कामगिरीत नियमितता आली आहे.

बी ग्रुपमध्ये कोणकोणत्या संघाचा समावेश?
फुटबॉल विश्वचषक 2022 मध्ये इंग्लंड संघाला बी ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. इंग्लंडसह बी ग्रुपमध्ये इराण, वेल्स आणि युनायटेड स्टेट्स या संघांचा समावेश करण्यात आलाय. इंग्लंडचा संघ या स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना 21 नोव्हेंबरला इराणशी खेळेल. त्यानंतर 26 नोव्हेंबरला यूएसए आणि 30 नोव्हेंबरला वेल्सशी भिडणार आहे.महत्वाचं म्हणजे प्रत्येक गटातील अव्वल दोन संघाला पुढील फेरीत प्रवेश करतील.

इंग्लंड फुटबॉल संघाचं वेळापत्रक

सामना विरुद्ध संघ तारीख
पहिला सामना इराण 21 नोव्हेंबर 2022
दुसरा सामना यूएसए 26 नोव्हेंबर 2022
तिसरा सामना वेल्स 30 नोव्हेंबर 2022

 

इंग्लंडचा फुटबॉलचा संघ-

गोलकीपर: जॉर्डन पिकफोर्ड, निक पोप, आरोन रॅम्सडेल.
डिफेंडर्स: हॅरी मॅग्वायर, ल्यूक शॉ, एरिक डायर, जोन स्टोन्स, काइल वॉकर, किरन ट्रिपियर, कोनोर कोडी, बेन वेट, ट्रेंट अलेक्झांडर अर्नोल्ड.
मिडफील्डर्स: जड बेलिंगहॅम, मेसन माउंट, कॉनोर गॅलाघर, डेक्लन राइस, जॉर्डन हेंडरसन, केल्विन फिलिप्स.
फॉरवर्ड्स: जेम्स मॅडिसन, फिल फोडेन, जॅक ग्रीलिश, हॅरी केन, बुकायो साका, रहीम स्टर्लिंग, कलम विल्सन, मार्कस रॅशफोर्ड.

हे देखील वाचा-