T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला सात विकेट्सनं नमवत फायनलमध्ये धडक दिलीय. टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या पाकिस्तानच्या संघानं उर्वरित तीन सामन्यात चांगली कामगिरी केली. पाकिस्तानला सेमीफानयलचं तिकीट मिळवून देण्यास नेदरलँड्सच्या संघाची भूमिका महत्वाची ठरली. सुपर 12 फेरीच्या ग्रुप '2' मधून भारतासह दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलसाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. परंतु, नेदरलँड्सच्या संघानं त्यांच्या अखेरच्या सामन्यात गुणतालिकेत टॉप 2 मध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धुळ चारत पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडले. त्यानंतर मिळालेल्या संधीचं सोनं करत पाकिस्तानच्या संघानंही बांग्लादेशचा पराभव करत सेमीफायनलमधील आपलं स्थान निश्चित केलं. 1992 च्या विश्वचषकातही अशाच काही गोष्टी घडल्या होत्या, ज्यामुळं पाकिस्तानचा संघ विश्वचषक विजेता ठरला होता.
1992 च्या विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला नशीबाची चांगलीच साथ मिळाली. या स्पर्धेतही पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती. परंतु, शेवटच्या क्षणी पाकिस्ताननं उपांत्य फेरी गाठली. पाकिस्ताननं सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. त्यानंतर फायनलमध्ये इंग्लंडलाही पराभवाची धुळ चारत विश्वचषक जिंकला होता. यंदाच्या विश्वचषकातही अशाच काही गोष्टी घडल्या, ज्या 1992 च्या विश्वचषका मिळत्या- जुळत्या आहेत. हे पाहता यंदाही पाकिस्तानचा संघ विश्वचषक जिंकणार का? अशा चर्चांना उधाण आलंय.
1992 च्या विश्वचषकातील पाच आश्चर्यकारक साम्य
1) 1992 च्या विश्वचषकाचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळालं होतं
2) ग्रुप सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 43 धावांनी पराभव केला.
3) 1992 च्या विश्वचषकातही पाकस्तानचा संघाला नशीबाची चांगली साथ मिळाली आणि त्यांनी सेमीफायनल गाठली, जे यंदाही पाहायला मिळालं.
4) 1992 च्या विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायलचा सामना पार पडला होता. या सामन्यात विजय मिळवत पाकिस्ताननं फायनलमध्ये धडक दिली.
5) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचाच संघ होता, जो यंदाही आहे.
बाबर अँड कंपनी इतिहासाची पुनरावृत्ती करणार का?
1992 च्या विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफानयलमध्ये इंग्लंडच्या संघानं दक्षिण आफ्रिकेचा पराभत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, या महत्वाच्या सामन्यात पाकिस्ताननं इग्लंडचा पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता. दरम्यान, 1992 विश्वचषक आणि यंदाच्या विश्वचषकातील साम्य पाहता बाबर अँड कंपनी इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? अशा चर्चांना सुरुवात झालीय.
हे देखील वाचा-