T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या संघानं न्यूझीलंडचा (NZ vs PAK) सात विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननं (Kane Williamson) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित 20 षटकात चार विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 154 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघानं 19.1 षटकातच हा सामना जिंकत फायनलमध्ये धडक दिली. या विजयासह पाकिस्तान संघानं ( Team Pakistan) खास विक्रमाला गवसणी घातलीय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आता पाकिस्तानच्या नावावर नोंदवला गेलाय.

टी-20 विश्वचषकातील पहिल्या सेमीफानयमध्ये न्यूझीलंड पराभव करून अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 29 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यातील 18 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं विजय नोंदवला आहे. तर, न्यूझीलंडच्या संघाला 11 सामने जिंकता आले आहेत. यातील आठ सामने न्यूझीलंडच्या संघानं त्यांच्या मायदेशात जिंकले आहेत. तर, पाकिस्तानच्या संघानं घरच्या मैदानावर सात  आणि उर्वरित 11 सामने न्यूट्रल ठिकाणावर जिंकले आहेत. पाकिस्तानच्या संघानं टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका संघाविरुद्ध संघाला पराभूत करण्याचा विक्रम केलाय. पाकिस्तानपूर्वी हा विक्रम भारताच्या नावावर होता, भारतानं 17 वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केलाय. 


एकाच संघाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय:

क्रमांक संघ सर्वाधिक विजय विरुद्ध संघ
1 पाकिस्तान न्यूझीलंड 18
2 भारत  वेस्ट इंडीज 17
3 भारत श्रीलंका 17
4 इंग्लंड पाकिस्तान 17

 

पाकिस्तानची फायनलमध्ये धडक
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना खेळवला गेला. ज्यात पाकिस्ताननं सात विकेट्स राखून  विजय मिळवत फायनल गाठली. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यात न्यूझीलंड संघानं प्रथम फलंदाजीच निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना केवळ 152 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर पाकिस्ताननं सलामीवीर बाबर आणि रिझवानच्या वादळी खेळीच्या जोरावर हा सामना जिंकला. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषकातील दुसरा सेमीफानयल सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पाकिस्तानशी अंतिम सामना खेळेल.

हे देखील वाचा-