Mount Everest Base Camp: माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा जगातील सर्वात उंच, कठीणात कठीण ट्रेक गृहिता विचारे हिनं नुकताच म्हणजेच 28 ऑक्टोबर 2022 रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा हा ट्रेक मुंबई्च्या गृहिता विचारे हिने नुकताच पार केला. अवघ्या आठ वर्षीय गृहितानं 28 ऑक्टोबर 2022 रोजी यशस्वीरीत्या हा ट्रेक पूर्ण केलाय.
माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठताना आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जी आव्हाने आमच्या समोर होती ती म्हणजे, सरळ चढ असलेली शिखरं सर करणे, उणे अंश तापमानाशी झुंझ (minus degree), थंडगार वारा, गोठलेलं पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठंही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आणि आव्हानात्मक हवामानातील बदलांना तोंड द्यावं लागलं, अशी प्रतिक्रिया गृहिताचे वडील सचिन विचारे यांनी दिली. माउंट एव्हरेस्ट चढताना भल्याभल्या भल्याभल्यांना देखील घाम फुटतो, पण गृहिताला ती एक प्रकारची हाव चढतच होती. काहीही झालं तरी ते उंच टोक गाठायचं म्हणजे गाठायचच अशी जिद्द उराशी बाळगून आपल्या पित्यासह तिनं उंची गाठण्यात यश संपादन केलं. हा ट्रेक तब्बल 13 दिवसांचा असून काठमांडूपासून (समुद्र सपाटीपासून 1400 मीटर उंच) रामेछाप विमानतळापर्यंत चार तासांचा आहे.
गृहिताची मोठी बहिण हरिता सुद्धा ट्रेकचा एक भाग होती पण टिंगबोचे (3 हजार 860 मीटर) च्या पुढं जाऊ शकली नाही. कारण, तिला जास्त उंचीच्या आजाराचा सामना करावा लागला आणि पुढील औषधांसाठी तिला कमी उंचीवरुन परत जावं लागलं आणि आता ती पूर्णपणे ठिक आहे. तुम्हां सर्वांच्या आशीर्वादाने मी आणि गृहिता काल माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प वर पोहोचलो आणि आता लुक्लाकडे परतीच्या प्रवासाला निघालो आहोत जो सोमवारपर्यंत पूर्ण होईल, असंही सचिन विचारेंनी म्हटलंय.
हे देखील वाचा-