T20 World Cup 2022: पाकिस्तानच्या संघानं आज झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात तीन धावांनी विजय मिळवला. मात्र, या स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात पाकिस्तानच्या पदरात निराशा पडली. ज्यामुळं पाकिस्तानचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खडतर झालाय. भारत आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी दुसऱ्या संघच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. ज्यात भारताचा मोलाचा वाटा असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थ स्टेडियमवर सुपर 12 फेरीतील सामना खेळला जातोय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) स्वस्तात माघारी परतले. यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) भारताच्या बाजूनं प्रतिक्रिया दिलीय.
प्रथम फलंदाजी करताना भारतानं 42 धावांवर चार विकेट्स गमावल्या. यादरम्यान, शोएब अख्तरनं ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत शोएब अख्तर पाकिस्तानला उपांत्य फेरीतील आशा जिवंत ठेवण्यासाठी भारतानं हा सामना जिंकावं, अशी प्रार्थना करताना दिसतोय.
व्हिडिओ-
भारताला पाकिस्तानसाठी जिंकणं आवश्यक
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शोएब अख्तर म्हणत आहे, “मी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की भारताला पाकिस्तानसाठी जिंकणे आवश्यक आहे. पाकिस्तानच्या आशेवर पाणी फेरायचं नाही, ते पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर काढत आहेत. आतापर्यंत चार विकेट्स गमावले. माहिती नाही पुढं काय होणार." शोएब अख्तरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा संघ भारताच्या कामगिरीवर अवलंबून
पाकिस्तानच्या संघाला सुपर 12 फेरीतील तिकिट मिळवण्यासाठी त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यांना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध सामन्यात विजय मिळवावा लागेल. ज्यामुळं त्याचे सहा गुण होतील. तसेच भारतीय संघानं त्याचे उर्वरित तीनही सामने जिंकले पाहिजेत. म्हणजेच, भारताच त्यांच्या पुढील सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वेला पराभव करणं गरजेचं आहे. ज्यानं पाकिस्तानचा उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल.
हे देखील वाचा-