MS Dhoni & World Cup 2023 Final : विश्वचषकाच्या (ICC ODI World Cup 2023) फायनलमधील (Final Match) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) सामन्यात भारताचा (India) पराभव झाला. टीम इंडियाच्या (Team India) पराभवामुळे कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची (Cricket Fans) निराशा झाली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीही (Mahendra Singh Dhoni) भारताच्या पराभवानंतर खूप निराश झाल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याने टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूसोबत (Indian Star Cricketer) फोनवरून चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनल सामन्यापूर्वी महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) विराट कोहली (Virat Kohli) सोबत फोनवरून संवाद साधला. कोहली आणि धोनीमध्ये (Dhoni & Kohli) सुमारे 35 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे. यानंतर तो रूममध्ये मॅच पाहू लागला. पण, टीम इंडियाच्या सतत विकेट पडल्यानंतर तोही काही काळ खोलीबाहेर आला. काही वेळाने माही पुन्हा मॅच पाहण्यासाठी रूममध्ये गेला, अशी माहिती मिळाली आहे.
सतत विकेट पडल्याने माही चिंतेत होता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचे पहिले तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले तेव्हा 'माही' नाराज दिसत होता. यावेळी पत्नी साक्षी आणि कुटुंबातील इतर सदस्य माजी कर्णधारासोबत होते. काही वेळाने धोनी पुन्हा रुममध्ये गेला आणि टीव्हीवर फायनल मॅच पाहू लागला. तसेच उपस्थित सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र सिंह धोनी अनेकदा टीम इंडियाचा सामना पाहतानारुममध्ये एकटाच राहतो.
धोनी सध्या काय करतोय?
गेल्या मंगळवारी धोनी कुमाऊं परिसरात पोहोचला होता. यानंतर धोनी पंतनगर मार्गे नैनिताल आर्मी गेस्ट हाऊसला गेला. गुरुवारी माही राजभवननंतर अल्मोडा, जैती मार्गे नैनितालला पोहोचला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेंद्र सिंग धोनी पत्नी साक्षीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नैनितालमध्ये आला होता. शनिवारी रात्री माहीने केक कापला आणि पत्नी साक्षीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सुरक्षा रक्षकासह इतर जवळच्या लोकांसोबत पार्टी केली.
टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्त्वात दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. यंदाच्या विश्वचषक 2023 चा अंतिम सामना पाहण्यासाठी धोनी मैदानावर उपस्थित राहिल अशी चर्चा होती. मात्र, असं झालं नाही. धोनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. आता आयपीएल 2024 मध्ये धोनी पुन्हा मैदानावर दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :