Most Valuable Team Of ICC Men's T20 World Cup 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आसीसीसीनं (ICC) टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम संघाची घोषणा केलीय. या संघात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) समावेश करण्यात आलाय. तर, भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) 12वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय. दरम्यान, आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मधील सर्वोत्तम संघ कसा आहे? हे जाणून घेऊयात.
टॉप ऑर्डर
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आलीय. यानंतर विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघातही विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतो. या विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं 6 डावात 98.67 च्या सरासरीनं 296 धावा केल्या आहेत.
मिडल ऑर्डर
चौथ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादवपासून मधल्या फळीला सुरुवात होत आहे. या विश्वचषकात सूर्याची बॅट चांगलीच तळपल्याची आपण पाहिलं आहे. यानंतर पाचव्या क्रमांकावर या टी-20 विश्वचषकात शतक झळकावणाऱ्या ग्लेन फिलिप्सचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर झिम्बाब्वेचा ऑलराऊंडर खेळाडू सिकंदर रझा सहाव्या क्रमांकावर आहे. रझानं या स्पर्धेतील आठ डावांमध्ये 147.97 च्या स्ट्राइक रेटनं 219 धावा केल्या.
ऑलराऊंडर
पाकिस्तानचा ऑलराऊंडर शादबा खानची सातव्या क्रमांकावर निवड झाली. शादाब खान या स्पर्धेत जबरदस्त लयीत दिसला. संपूर्ण स्पर्धेत त्याच्या बॅटमधून 98 धावा निघाल्या आणि गोलंदाजी करताना त्यानं 11 विकेट्स घेतल्या.
गोलंदाज
या संघात इंग्लंडचा ऑलराऊंडर आणि 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' सॅम करन आठव्या क्रमांकावर आहे. सॅम करननं या विश्वचषकात 11.38 च्या सरासरीनं एकूण 13 विकेट घेतल्या. यानंतर आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्खिया नवव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर इंग्लंड आणि टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज मार्क वूड दहाव्या क्रमांकावर आहे. तर, शाहीन आफ्रिदीला 11व्या क्रमांकावर ठेवण्यात आलंय. संघ इथेच संपला असला तरी हार्दिक पांड्याची 12वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय.
टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम संघ-
एलेक्स हेल्स, जॉस बटलर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रजा, शादाब खान, सॅम करन, एनरिक नॉर्खिया, मार्क वूड, शाहीन आफ्रिदी, हार्दिक पांड्या (12वां खिलाड़ी).
हे देखील वाचा-