England Team Celebration in Dressing Room: टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा (Eng vs Pak) पाच विकेट्सनं धुव्वा उडवत दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. या विजयानंतर संपूर्ण इंग्लंड संघ आणि कोचिंग स्टाफनं ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष साजरा केला. आयसीसीनं (ICC) ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन करतानाचा इंग्लंड संघाचा एक खास व्हिडीओ शेअर केलाय. आयसीसीने शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
दरम्यान, आयसीसीनं आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून इंग्लंडच्या संघाचा ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स, मार्क वूड, जोस बटलर आणि सर्व खेळाडूसह कोचिंग स्टाफ जल्लोष करताना दिसत आहेत. आयसीसीनं शेअर केलेला हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा पाच विकेट्सनं विजय
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानच्या संघानं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून 137 धावा केल्या. पाकिस्तानकडून शान मसूदनं सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. सॅम करन हा इंग्लंडसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या सामन्यात सॅम करननं तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांना 2-2 विकेट्स मिळाले. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानं 19व्या षटकातच पाच विकेट्स राखून लक्ष्य गाठलं. इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं 52 धावांची खेळी केली.
पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरची प्रतिक्रिया
पाकिस्तानसाठी यावेळी ही स्पर्धा चढ-उतारांनी भरलेली होती. सुरुवातीच्या सामन्यांमध्येही संघाला टीकेला सामोरे जावे लागले, मात्र संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला. या पराभवानंतर शोएब अख्तरही निराश दिसला. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून या पराभवावर आपले म्हणणे मांडले. 'हा विश्वचषक पाकिस्तान हरला असला तरी भारतातच विश्वचषक जिंकेल, असा विश्वास अख्तर यांना आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत त्यानं हे सांगितलं आहे.
व्हिडिओ-
हे देखील वाचा-