Jasprit Bumrah Ruled Out : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे विश्वचषकाला मुकणार आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो विश्वचषकाला मुकणार आहे.  पीटीआयनं बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार असल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, दुखापतीमुळे अष्टपैलू रवींद्र जाडेजा विश्वचषकाला मुकला आहे. त्यात आता आणखी एका महत्वाच्या खेळाडूला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. दरम्यान, बीसीसीआयनं जसप्रीत बुमराहबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. पीटीआयनं बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार असल्याचं वृत्त दिलं आहे.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी सराव करताना जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली, ज्यामुळं संघ व्यवस्थापनानं बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. दुखापतींशी झुंजणाऱ्या जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतून संघात पुनरागमन केलं होतं. त्याची दुखापत किरकोळ असल्याचं बीसीसीआयनं बुधवारी स्पष्ट केलं होतं. पण जसप्रीत बुमराहची दुखापत जास्त गंभीर असल्याचं आज समोर आलेय.   


जसप्रीत बुमराहची दुखापत चिंता वाढवणारी
भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आधीच गुडघ्याच्या दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळं संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकावं लागलंय. त्यानंतर आता जसप्रीत बुमराहच्या दुखपतीनं टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. बीसीसीआयमधील सुत्रांच्या माहितीनुसार, दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह विश्वचषक खेळण्याची शक्यता नाही. बुमराहच्या दुखापतीनं भारताच्या चिंतेत भर पडली आहे. कारण आधी रवींद्र जाडेजा त्यानंतर आता जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडलाय. 






टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. 
राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.


आणखी वाचा :
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकापूर्वी भारताचं टेन्शन वाढलं; रवींद्र जाडेजानंतर आणखी एका स्टार ऑलराऊंडरला दुखापत
T20 World Cup 2022 : 'पाकिस्तानची नवी जर्सी कलिंगडासारखी वाटतेय', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनेच उडवली खिल्ली