T20 World Cup 2022: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर तिसरा टी-20 सामना खेळला जातोय. या सामन्याला सुरुवात होण्याच्या काही मिनिटांपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आलीय. रवींद्र जाडेजानंतर (Ravindra Jadeja) भारताचा युवा ऑलराऊंडर दीपक हुडाला (Deepak Hooda) दुखापत झालीय. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दीपक हुडा रविवारी तिसऱ्या टी-20 सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळं त्याचा प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट करण्यात आला नाही. दीपक हुडाच्या पाठीला दुखापत झाल्याचं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलंय.


महत्वाची गोष्ट म्हणजे, ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात दिपक हुडा भारतीय संघाचा भाग होता. त्याची दुखापत गंभीर असल्यास टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. दीपक हुडानं अलीकडच्या काळात टी-20 मध्ये चांगली कामगिरी केलीय. फलंदाजीसोबत तो संघासाठी गोलंदाजीही करू शकतो.


ट्वीट-






 


टीम इंडियाच्या अडचणीत भर
टी-20 विश्वचषकाला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय. यापूर्वी भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळं टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलाय. तर, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला कोरोनाची लागण झाली. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून त्याला मुकावं लागलं. मोहम्मद शामीला टी-20 विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आलंय. 


टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. 
राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.


हे देखील वाचा-