World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकात (Cricket World Cup 2023) भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी पाहायला मिळत आहे. विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) मध्ये एकीकडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या खेळाडूंची तुफान कामगिरी पाहायला मिळत असताना, दुसरीकडे भारतीय गोलंदाजांचा (Indian Bowlers) भेदक मारा संघाला विजय मिळवून देताना दिसत आहे. भारतीय खेळाडूंच्या फलंदाजांसह गोलंदाजांनीही संघाला सलग सहा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताने याआधीच्या सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत 30 वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
गोलंदाजी भारतीय संघाची ताकद
विश्वचषकात भारतीय गोलंदाजांची ताकद जगाने पाहिली आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय फलंदाजांनी भल्या-भल्या फलंदाजांची सुट्टी केली आहे. हे तुम्हाला आकडेवारीतूनच स्पष्ट दिसेल. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत जसप्रित बुमराहने सर्वाधिक 14 विकेट घेतल्या आहे. त्यामागे दुसऱ्या क्रमांकावर कुलदीप यादवने दहा बळी घेतले आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये मोहम्मद शामीने आतापर्यंत 9 विकेट घेतल्या आहेत, तर जाडेजाने 8 विकेट आणि मोहम्मद सिराजने सहा विकेट घेतल्या आहेत.
विश्वचषकात भारतीय गोलंदाजांची कामगिरी
वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय गोलंदाजांची इकोनॉमी सुद्धा सर्वोत्तम आहे.
30 वर्षांनंतर भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाला 230 धावांचे लक्ष्य दिलं होतं, त्यामुळे इंग्लंड संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या उत्कृष्ट कामगिरीसमोर संपूर्ण इंग्लंड संघ हतबल झाला. फक्त 129 धावा केल्या पण ऑल आऊट झाला. मोहम्मद शमीने जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स आणि आदिल रशीद यांना क्लीन बोल्ड केले. जसप्रीत बुमराहने मार्क वुड आणि डेव्हिड मलानला क्लीन बोल्ड केले, कुलदीप यादवने जोस बटलरला क्लीन बोल्ड केले. इंग्लंडविरुद्ध गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी 6 बळी घेतले. गोलंदाजांच्या जोरावर टीम इंडियाने आपल्या 30 वर्षांच्या जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. 1993 मध्ये कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाजी करताना 6 विकेट घेतल्या होत्या.
एकदिवसीय विश्वचषकात सलग सहा विजय
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून सलग सर्व सहा जिंकले आहेत. भारत 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.