India vs Zimbabwe, Toss Update : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारत बऱ्याच फलंदाजांसह मैदानात उतरत असल्याने एक मोठी धावसंख्या उभारण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. विशेष म्हणजे भारतानं आपला स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) संघात घेतलं आहे.






भारतीय संघ गुणतालिकेतील कमाल कामगिरीमुळे आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारतापाठोपाठ पाकिस्तानचा संघही सेमीफायनलमध्ये पोहोचला असला तरी पाकिस्तानकडे 6 गुण आहेत, पण भारताने आज झिम्बाब्वेला मात दिल्यास भारत 8 गुणांसह सर्वाधिक गुणांनी सेमीफायनलमध्ये पोहोचेल. त्यामुळे सर्वाधिक गुणांनी सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला झिम्बाब्वेला मात देणं गरजेचं आहे. भारतीय संघाच्या अंतिम 11 चा विचार करता केवळ एक बदल करण्यात आला आहे. यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंत संघात आला आहे. रोहितने या बदला बद्दल बोलताना पंतने या स्पर्धे एकही सामना खेळलेला नाही, सराव सामनाही नाही. त्यामुळे त्याला संधी देत असल्याचं म्हटलं आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे पाहूया...


कशी आहे टीम इंडिया?


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.


कसा आहे झिम्बाब्वेचा संघ?


वेस्ली मधेवेरे, क्रेग एर्विन (कर्णधार), रेगिस चकाब्वा (विकेटकीपर), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, टोनी मुन्योंगा, रायन बर्ल, तेंडाई चतारा, रिचर्ड नगारावा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबान


हेड टू हेड रेकॉर्ड


भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत सात आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले. यातील सात पैकी पाच सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 सामन्यात भारताकडून सर्वाधिक 100 धावांची खेळी केली.  टी-20 सामन्यातील आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. 


हे देखील वाचा-