IND vs PAK: क्रिकेट विश्वातील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी म्हटलं की भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) ही दोन नावचं डोळ्यासमोर येतात. दोन्ही देशातील संबंध सलोख्याचे नसल्याने दोन्हीही देश एकमेंकाचा दौरा करत नाहीत. ज्यामुळे केवळ जागतिक टूर्नामेंटमध्येच हे दोन्ही संघ आमने-सामने येतात. त्यामुळे या सामन्याकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष लागून असतं. अशात आता आगामी टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) दोन्ही संघ आमने-सामने येणार असल्याने क्रिकेटप्रेमींची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळेच सामन्याला अजून तीन महिने शिल्लक असतानाच सर्व तिकिट्सची विक्री झाली आहे. 


टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन्ही संघ 23 ऑक्टोबर रोजी आमने-सामने येणार आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) खेळवल्या जाणाऱ्या या सामन्याला जवळपास तीन महिने शिल्लक असताना सर्व तिकिट्स विकले गेले आहेत. ऑस्ट्रेलिया टूरिज्म आणि अन्य ट्रॅव्हल एजेंट्सकडून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान ग्लोबल स्पोर्ट्स ट्रॅव्हल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 40 टक्के पॅकेज हे भारतात विकण्यात आले आहेत. तर नॉर्थ अमेरिका येथे 27%, ऑस्ट्रेलियात 18 % आणि इंग्लंडसह अन्य देशांत 15 % पॅकेजची विक्री झाली आहे. दरम्यान सामान्य तिकिट्स यावेळी विकले गेले असले तरी काही व्हीआयपी तिकिट्स शिल्लक असल्याचीही माहिती समोर येत आहे.


ऑक्टोबरपासून रंगणार टी20 विश्वचषक


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.


यंदाच्या विश्वचषकात कसे असतील ग्रुप?


ग्रुप-1: इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर 
ग्रुप-2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अन्य दोन क्वालिफायर 


हे देखील वाचा-