India vs Sri Lanka, ODI World Cup 2023 : मुंबई (Mumbai) तील वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) वर 2011 नंतर पुन्हा एकदा भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. 2 एप्रिल 2011 रोजी वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) वर एकदिवसीय विश्वचषकाचा (ODI World Cup) अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात खेळवला गेला होता. या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. आता तब्बल एक दशकाडून अधिक काळानंतर म्हणजेच 12 वर्षांनंतर हे दोन्ही संघ पुन्हा याच मैदानावर आमनेसामने येणार आहेत. 


2011 नंतर वानखेडेवर भारत आणि श्रीलंका आमनेसामने


गेल्या 12 वर्षांत भारत आणि श्रीलंका यांच्यात अनेक सामने झाले असले तरी विश्वचषकाच्या सामन्याची बात काही औरच आहे. यंदाच्या विश्वचषकात टीम इंडिया उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर उभी आहे, तर श्रीलंका संघांचं आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांची आकडेवारी काय आणि कुणाचं पारड भारी आहे, ते जाणून घ्या.


सलग सहा सामन्यात भारताची विजय


भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील साखळी सामना 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुपारी 2 वाजता खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडिया मुंबईत दाखल झाली असून त्यांनी सरावाला सुरू केली आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने सहा सामने जिंकले आहे. पण, भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालेलं नाही. श्रीलंकेविरुद्धचा सामना सामना जिंकून टीम इंडियाला उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. 


एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि श्रीलंकेची आकडेवारी


एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 9 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने चार वेळा तर श्रीलंकेने चार वेळा विजय मिळवला आहे, तर एक सामना ड्रॉ झाला. 


कुणाचं पारडं जड?


एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघ श्रीलंकेपेक्षा खूप पुढे आहे. आतापर्यंत झालेल्या 167 सामन्यांपैकी भारतीय संघाने 98 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. तेथे सामना बरोबरीत आहे. त्यामुळे याबाबतील भारतीय संघ खूप पुढे आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


World Cup 2023 : श्रेयस अय्यरला आराम! हार्दिक लवकरच संघात परतणार, प्लेईंग 11 मध्ये सूर्यकुमार कायम राहणार