T20 World Cup 2022: क्रिकेटमधील सर्वात गाजलेली आणि बहुप्रतिक्षीत लढत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आज (23 ऑक्टोबर 2022) आमने-सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उस्तुकता पाहायला मिळत आहे. परंतु, मेलबर्नमध्ये सतत पडणाऱ्या पावसानं चाहत्यांची धाकधूक वाढवलीय.तसेच आज म्हणजेच भारत- पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या दिवशी मेलबर्नमध्ये पाऊस पडण्याची शक्यता होती. पण मेलबर्नच्या ताज्या अपडेटनुसार, मेलबर्नमधील वातावरणात बदल पाहायला मिळत असून भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे. यामुळं क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील क्रिकेटचा थरार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

भारतीय वेळेनुसार, शनिवारी सकाळी मेलबर्नमध्ये सलग सहा तास पाऊस पडला. मेलबर्नमधील ढगाळ वातावरण निर्माण झालं, त्यामुळं रविवारीपर्यंत हवामानात बदल होणार नाही, असा अंदाज लावला जात होता. परंतु, आता मेलबर्न येथील वातावरणात बदल पाहायला मिळतोय. मिळालेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथील पावसाची शक्यता कमी झालीय. ज्या ठिकाणी पहिल्या दिवशी 80 टक्क्यांपर्यतं पाऊस पडण्याची शक्यता होती, ती आता 25 टक्क्यांपर्यंत खाली घसरलीय. 

भारताचं टी-20 विश्वचषकातील वेळापत्रक:

सामना विरुद्ध संघ तारीख वेळ ठिकाण
पहिला सामना पाकिस्तान 23 ऑक्टोबर दुपारी 1.30 वा. मेलबर्न
दुसरा सामना नेदरलँड्स 27 ऑक्टोबर दुपारी 12.30 वा. सिडनी
तिसरा सामना दक्षिण आफ्रिका 30 ऑक्टोबर दुपारी 4.30 वा. पर्थ
चौथा सामना बांग्लादेश 2 नोव्हेंबर दुपारी 1.30 वा. अॅडिलेड
पाचवा सामना झिम्बाब्वे 6 नोव्हेंबर दुपारी 1.30 वा. मेलबर्न

 

संभाव्य संघ

भारत:
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

पाकिस्तान:
बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.

हे देखील वाचा-