IND vs PAK Match Live Streaming : कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आज एकमेंकाशी भिडणार आहेत. दोन्ही संघाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेतील हा पहिलाच सामना असणार आहे. दोन्ही संघाना आजचा सामना जिंकण अत्यंत महत्त्वाचं असून विजेता संघ गुणतालिकेत आघाडी घेईलच पण दोन्ही देशांतील कट्टर प्रतिस्पर्धीपणामुळे हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानाला जाणार आहे. तर या दोन्ही संघासाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...
कधी आहे सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आज अर्थात 23 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियम (Melbourne Cricket Stadium) येथे खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. तसंच डीडी स्पोर्ट्सवरही सामन्याचं थेट प्रक्षेपण होईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान Head to Head
टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ यांच्यात आतापर्यंत 11 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवलाय. तर, पाकिस्तान संघाला 3 सामने जिंकता आले आहेत.
कसे असू शकतात दोन्ही संघ?
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
टी 20 विश्वचषकात कसं आहे भारताचं वेळापत्रक?
सामना | तारीख | वेळ |
भारत विरुद्ध पाकिस्तान | 23 ऑक्टोबर | दुपारी 1.30 वाजता |
भारत विरुद्ध नेदरलँड | 27 ऑक्टोबर | दुपारी 12.30 वाजता |
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका | 30 ऑक्टोबर | दुपारी 4.30 वाजता |
भारत विरुद्ध बांग्लादेश | 2 नोव्हेंबर | दुपारी 1.30 वाजता |
भारत विरुद्ध झिम्बाब्वे | 6 नोव्हेंबर | दुपारी 1.30 वाजता |
हे देखील वाचा-