India vs Bangladesh, Playing 11 : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारत विरुद्ध बांग्लादेश (IND vs BAN) सामन्याला सुरुवात होत आहे. बांग्लादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली असून अंतिम 11 मध्ये एका बदलासह दोन्ही संघ मैदानात उतरत आहेत. भारताने अष्टपैलू अक्षर पटेलला (Axar Patel) पुन्हा संघात घेतलं असून दीपक हुडाला (Deepak Hooda) विश्रांती देण्यात आली आहे. आज होणारा भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यातील सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रुप 2 मध्ये दोन्ही संघाची स्थिती बऱ्यापैकी सारखी असून आज जिंकणारा संघ आणखी मजबूत आघाडी घेईल. ग्रुप 2 गुणतालिकेतूनसेमीफायनलमध्येही पोहोचण्यासाठी दोघांना आजचा विजय अत्यंत फायदेशीर असेल.


दरम्यान रविवारी झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात भारताचा खेळ फारच सुमार झाला. गोलंदाजांनी चमक दाखवली पण फलंदाज फारच स्वस्तात तंबूत परतले. त्यामुळे आज अंतिम 11 मध्ये बदल होणार अशी आशा होती. दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाठीला दुखापत झाल्यामुळं तो आज संघात नसेल असं वाटत होत. पंतला संधी मिळेल असं वाटत असतान कार्तिकचं संघात आहे. पण शून्यावर बाद झालेला हुडा बाहेर गेला असून अक्षर पटेल आत आला आहे. बांग्लादेश संघाचा (Team Bangladesh) विचार करता आज त्यांनी देखील एक बदल करत सौम्या सरकारच्या जागी शोरीफुल इस्लामला संधी दिली आहे.


कशी आहे टीम इंडिया?


रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.


कसा आहे बांग्लादेश संघ?


नजमुल हुसैन शान्तो, शोरीफुल इस्लाम, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसादेक हुसैन, नूरुल हसन (विकेटकीपर), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्कीन अहमद