IND vs BAN Playing 11 : यंदाच्या विश्वचषकात (World Cup 2023) भारतीय संघ (Team India) दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. आज भारत आणि बांगलादोश (India vs Bangladesh) संघ एकमेकांसमोर येणार आहे. आज टीम इंडिया (Team India) चौथ्या सामन्यात विजय मिळवून विजयी वाटचाल कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल . यामुळे भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यास मदत होईल. तर, बांगलादेश संघ भारताचा पराभव करून स्पर्धेत कायम राहण्यासाठी स्पर्धा करेल. 


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सिराजला विश्रांती?


या सामन्यापूर्वी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) ला विश्रांती दिली जाईल का? बाहेर बसलेल्या मोहम्मद शमी (Mohmmed Shami) ला संधी मिळेल का? जसप्रीत बुमराह किंवा शार्दुल ठाकूर यांना विश्रांती दिली जाईल का? रविचंद्रन अश्विन सामन्यात पुनरागमन करू शकेल का? याबाबत सविस्तर वाचा.


आजच्या सामन्यात शमीला संधी मिळणार?


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते आणि शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, सिराज सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने त्याला बाहेर ठेवणं संघासाठी सोपं नाही.  शमीची गुणवत्ता लक्षात घेता, त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेणे खूप कठीण आहे.  बुमराह हा देखील जागतिक दर्जाचा गोलंदाज असून त्यालाही बाहेर ठेवणं कठीण आहे. तो सामना जिंकण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सिराजबद्दल बोलायचे झाले तर म्हणजे टीम इंडियाने क्वचितच संघात कोणतेही बदल करावेत हे स्पष्ट आहे. म्हणजेच सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी यांना विश्वचषक सामना खेळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.


अश्विन की शार्दूल, कोण मैदानात उतरणार? 


रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत 10 षटकात 34 धावा देत एक बळी घेतला. असे असलं तरी त्याला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्धच्या सानन्यात संधी देण्यात आली नव्हती. दुसरीकडे अश्विनच्या जागी संधी मिळालेल्या शार्दुल ठाकूरला एक विकेटही मिळवता आलेली नाही.


बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Team India Playing 11 vs Bangladesh)


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IND vs BAN, Weather Report : भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचं सावट? पुण्यातील हवामान कसं असेल? जाणून घ्या