IND vs PAK : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेला ऑस्ट्रेलियात सुरुवात झाली आहे. दरम्यान भारतीय संघाचा आज पहिला-वहिला सामना रंगणार आहे.  भारतासमोर आज पाकिस्तानचं (India vs Pakistan) संघाचं आव्हान असणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर हा खेळवला जात आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान असणाऱ्या ग्रुपमध्ये इतर संघ तितके खास फॉर्ममध्ये नसल्याने आजचाच सामना जिंकणं भारत आणि पाकिस्तान दोघांसाठी महत्त्वाचं असेल,तर अशा या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.


ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा विचार करता या स्टेडियमवर पहिल्या डावाची एकूण सरासरी 139 आहे तर दुसऱ्या डावाची एकूण सरासरी 127 आहे. स्टेडियमवर आतापर्यंत 18 T20 सामने झाले आहेत. स्टेडियमवर आतापर्यंतचा सर्वोच्च संघ 184-4 आहे. खेळपट्टी गोलंदाजांना चांगला बाऊन्स देत असल्याने वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होताना दिसतो. वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत स्पिनर्सना अधिक फायदा होत नाही.


कसा आहे भारत विरुद्ध पाकिस्तानचा आजवरचा इतिहास?


टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ यांच्यात आतापर्यंत 11 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवलाय. तर, पाकिस्तान संघाला 3 सामने जिंकता आले आहेत.  


संभाव्य भारतीय संघ -


रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार. 


संभाव्य पाकिस्तानचा संघ -


बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.


कधी, कुठं पाहाल सामना?


भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हा सामना रविवारी 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्याीतील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.


हे देखील वाचा - 


IND vs PAK : ऑस्ट्रेलियात टी 20 मध्ये पाकिस्तानची पाटी कोरीच, भारताची जबरदस्त कामगिरी