ICC T20I Ranking: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सूर्या टी-20 क्रिकेटमध्ये सातत्यानं धावा करतोय, ज्याचा फायदा त्याला आयसीसी टी-20 रँकींगमध्ये झालाय. आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 फलंदाजाच्या ताज्या क्रमवारीनुसार, सूर्यानं पाकिस्तानचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानकडून अव्वल स्थान हिसकावून घेतलंय.
ट्वीट-
सूर्याची टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी
सूर्याकुमार यादवनं गेल्या वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर भारतीय संघातील आपलं स्थान निश्चित केलं. सूर्या गेल्या अनेक सामन्यांपासून सातत्यानं चांगली कामगिरी बजावत आहे. सध्या सूर्याची जगातील सर्वोकृष्ट फलंदाजमध्ये गणना केली जात आहे. सूर्यानं खूप कमी कालावधीत क्रिडाविश्वावर छाप सोडलीय. सूर्याचे सध्या 863 गुण झाले आहेत. तर, मोहम्मद रिझवान 842 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉन्वे टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी आहे, त्याचे 792 गुण आहेत.
यंदाच्या वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
सूर्यकुमार जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये तो या वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. त्यानं 2022 मध्ये आतापर्यंत 27 सामन्यांमध्ये 41.95 च्या सरासरीने आणि 183.80 च्या स्ट्राइक रेटनं 965 धावा केल्या आहेत. ज्यात एका शतकाचा समावेश आहे.त्यानं यावर्षी इंग्लंडविरुद्ध 117 धावा केल्या होत्या. यावर्षी सूर्यकुमारनं आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एक शतक आणि आठ अर्धशतकं झळकावली आहेत.
हे देखील वाचा-