Sandeep Lamichhane: क्रीडाविश्वातील एक लाजिरवाणं प्रकरण समोर आलंय. नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछानेविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्याच्याविरोधात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर नेपाळ क्रिकेट असोसिएशन (Cricket Association of Nepal) गुरुवारी संदीप लामिछानेविरुद्ध तातडीनं कारवाई करत त्याला निलंबित केलं आहे.
नेपाळ क्रिकेट असोसिएशननेही एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यात असं लिहिलंय की, संदीप लामिछानेविरुद्ध काठमांडू येथील पोलीस ठाण्यात 17 वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा तक्रार नोंदवण्यात आलीय. ज्यावेळी हे आरोप करण्यात आले, तेव्हा संदीप वेस्ट इंडीजला होता आणि कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत होता. परंतु, त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्यानं त्याला तात्काळ परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संदीप लामिछानं कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये जमैका तल्लावाह संघाकडून खेळतोय. मात्र, लैंगिक अत्याराच्या आरोपानंतर जमैका तल्लावाह संघानं त्याला रिलीज केलंय. लवकरच संदीप नेपाळमध्ये परतणार आहे.तसेच काठमांडूच्या न्यायालयात हजर राहणार आहे.
नेपाळ बोर्डाच्या सचिवांचं निवेदन
नेपाळ बोर्डचे सचिव प्रशांत विक्रम मल्लानं जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की, "क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळच्या बैठकीत संदीप लामिछानेला निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संदीप काठमांडू पोलिसांसमोर हजर राहायचं आहे. या प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीनं पूर्ण व्हावी, यासाठी बोर्डानं संदीपविरुद्ध निलंबनाची कारवाई केलीय."
आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा एकमेव क्रिकेटपटू
संदीप लामिछानं नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आहे. तो नेपाळचा एकमेव खेळाडू आहे, जो जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळलाय. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछानं नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि लंका प्रीमिअर लीगसह अनेक लीगमध्ये खेळत आहे.
सतराव्या वर्षी आयपीएल खेळण्याची संधी
संदीप लामिछानेनं 17 व्या वर्षीच आयपीएलचा पहिला सामना खेळला होता. दिल्लीच्या संघानं 2018 मध्ये संदीप लामिछानला 20 लाखात खरेदी केलं होतं. संदीपनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संदीपनं नेपाळसाठी 44 टी-20 सामन्यात 85 विकेट्स घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-