Mumbai Cricket Association Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्षपदासाठीची निवडणूक 20 ऑक्टोबरला पार पडणार असून यावेळी शदर पवार (Sharad Pawar)- आशिष शेलार (Ashish Shelar) पॅनलकडून अमोल काळेंच्या (Amol Kale) नावाची घोषणा करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटर संदीप पाटील (Sandeep Patil) असणार असून या निवडणूकीपूर्वी काळे यांनी आपण ही निवडणूक कर्तृत्वाच्या जोरावर लढवत आहे,' माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त नाही.' असं वक्तव्य केलं आहे. 


काय म्हणाले अमोल काळे?


अमोल काळे यांना राजकीय संबंधामुळे ही संधी मिळाल्याची टीका झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ''मी देवेंद्र फडणवीस यांचा मित्रा आहे म्हणून माझ्यासंदर्भात असं बोललं जातं. पण मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर एमसीए निवडणूक लढवत आहे. माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त आहे हे आरोप चुकीचे आहेत. तसंच माझा एमसीएशी काही संबंध नाही असं म्हणन चूकीचं आहे, मी जवळपास 7 वर्ष एमसीएमध्ये काम करतोय. मला मुंबई क्रिकेटसाठी भरपूर काही करायचं आहे यासाठीच मी निवडणूक लढतोय. पवार-शेलार एकत्र फक्त माझ्यासाठी आलेले नाहीत. या आधी ही पवार-शेलार किंवा राजकीय नेते राजकारणापलीकडे एकत्र आले आहेत. हे काही नवीन नाही.''


पुढे प्रतिस्पर्धी संदीप पाटील यांच्याबद्दल बोलताना काळे म्हणाले, ''संदिप पाटील यांच्या प्रति मला पूर्ण आदर आहे. मला माझ्या पॅनलने सांगितलं निवडणूक लढा म्हणून मी उभा राहिलो. मी काही पहिला व्यक्ती नाही जो क्रिकेटर विरुद्ध निवडणूकीला उभा राहिलो आहे. याआधी ही राजकीय नेते विरुद्ध क्रिकेटपटू अशी लढाई झाली आहे. माझा तर राजकरणाशी काही संबंध नाही. केवळ देवेंद्र यांचा मित्र म्हणून मी काही राजकीय नेता होत नाही.''


आशिष शेलार बीसीसीआय खजिनदार


आधी एमसीए निवडणूकीत आशिष शेलार यांचं नाव घेतलं जात होतं. ते अध्यक्षपदासाठी असतील अशी चर्चा होती, पण त्यांची थेट बीसीसीआय खजिनदार पदासाठी वर्णी लागल्याने ते या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. याशिवाय बीसीसीआय अध्यक्ष म्हणून माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्ष राजीव शुक्ला हेच राहणार आहेत.


हे देखील वाचा -