T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील सामन्यात झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानच्या (Zim vs Pak) संघाचा अवघ्या एका धावेनं पराभव केला. यापूर्वी पाकिस्तानला या स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताकडूनही (IND vs PAK) पराभव स्वीकारावा लागला होता. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानचा संघ आता उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. मात्र, भारताच्या मदतीनं पाकिस्तानच्या संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवता येईल. दरम्यान, पाकिस्तान संघाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी समीकरण कसं असेल? हे जाणून घेऊयात.
उर्वरित तिन्ही सामने जिंकणं पाकिस्तानला अनिवार्य
पाकिस्तानच्या संघाला सुपर 12 फेरीतील त्यांचे उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतीज. त्यांना नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध सामन्यात विजय मिळवावा लागेल. ज्यामुळं त्याचे सहा गुण होतील.
भारतानं त्यांचे उर्वरित तिन्ही सामने जिंकणं गरजेचं
भारतीय संघानं त्याचे उर्वरित तीनही सामने जिंकले पाहिजेत. म्हणजेच, भारताच त्यांच्या पुढील सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वेला पराभव करणं गरजेचं आहे. ज्यानं पाकिस्तानचा उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल.
दक्षिण आफ्रिकेचा तीन पैकी एका सामन्यात पराभव महत्वाचा
भारताविरुद्ध सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाल्यास त्यांचा नेदरलँड्सकडून पराभव व्हावा, अशी पाकिस्तानच्या संघाला प्रार्थना करावी लागेल. महत्त्वाचं म्हणजे, दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तीन पैकी एक सामना गमवाला पाहिजेत. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात पाच गुण शिल्लक राहतील.
झिम्बाब्वेच्या संघावरही अवलंबून राहावं लागेल
झिम्बाब्वेचे अजूनही तीन गुण आहेत. झिम्बाब्वेला त्यांच्या उरलेल्या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागेल. झिम्बाब्वेला अजून भारत, नेदरलँड आणि बांगलादेशविरुद्ध सामने खेळायचे आहेत.
बांग्लादेशचे तीन सामने शिल्लक
बांगलादेशचे दोन सामन्यांतून दोन गुण आहेत. त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत. बांगलादेश संघाला अद्याप भारत, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेविरुद्ध सामने खेळायचे आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी बांगलादेशला हरवल्यास बांगलादेश उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
व्हिडिओ-
हे देखील वाचा-