Semifinal in T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आज ग्रुप 1 मधील इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (ENG vs SL) असा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे ग्रुप 1 मधून न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला असून दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलियासह इंग्लंडमध्ये चुरस आहे. कारण ग्रुप 1 मधील श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांचं आव्हान आधीच संपलं आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाकडे 7 गुण असून आज इंग्लंड जिंकल्यास त्यांच्याकडेही 7 गुण येतील. पण इंग्लंडचा नेटरन रेट चांगला असल्याने ते नक्कीच सेमीफायनलमध्ये जातील. त्यामुळे आज ऑस्ट्रेलियन चाहते श्रीलंकेच्या विजयाची अपेक्षा करतील. 

कधी, कुठे पाहाल सामना?

आजचा हा इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (England vs Sri Lanka) सामना भारतीय वेळेनुसार 1.30 वाजता खेळवला जाईल. सामन्याआधी अर्धातास नाणेफेक होईल. दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना सिडनीच्या क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कशी आहे ग्रुप 1 ची गुणतालिका?

सुपर-12 ग्रुप 1

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 न्यूझीलंड 5 3 1 1 7 +2.113
2 ऑस्ट्रेलिया 5 3 1 1 7 -0.173
3 इंग्लंड 4 2 1 1 5 +0.547
4 श्रीलंका 4 2 2 0 4 -0.457
5 आयर्लंड 5 1 3 1 2 -1.165
6 अफगाणिस्तान 5 0 2 2 2 -0.718

ग्रुप 2 चं काय?

भारत असणाऱ्या ग्रुप 2 चा विचार करता सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी अगदी चुरशीची लढत दिसून येत आहे. आधी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघच सेमीफायनलचे दावेदार होते, पण पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेवर एक मोठा विजय मिळवत गुणतालिकेत आघाडी घेतली असून सेमाफायनलच्या रेसमध्ये पुनरागमन केलं आहे.  तर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकल्यावर गुणतालिकेत ते थेट तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. तसंच त्यांचा नेट रनरेटही +1.441 इतका झाल्यामुळं ते स्पर्धेत मजबूत स्थितीत आले आहेत. भारत अव्वलस्थानी असला तरी नेटरनरेटच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या मागे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. हे तीन संघच सेमीफायनलच्या शर्यतीत पुढे असून नेदरलँड, झिम्बाब्वे यांचं आव्हान जवळपास संपलं आहे. बांगलादेशचंही पुढे पोहोचणं अवघड आहे.

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 भारत 4 3 1 0 6 +0.730
2 दक्षिण आफ्रिका 4 2 1 1 5 +1.441
3 पाकिस्तान 4 2 2 0 4 +1.117
4 बांगलादेश 4 2 2 0 4 -1.276
5 झिम्बाब्वे 4 1 2 0 3 -0.313
6 नेदरलँड्स 4 1 3 0 2 -1.233

हे देखील वाचा-

T20 World Cup 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तानसह 'या' पाच सामन्यांनी चाहत्यांची धाकधुक वाढवली, पाहा हायवोल्टेज सामन्यांची यादी